'दिल दोस्ती दुनिया दारी','तुला पाहते रे','आई कुठे काय करते','अग्ग बाई सासू बाई','माझा होशील ना' या लोकप्रिय मालिकांच्या शिर्षकगीते आर्याने गायली आहेत.  aarya ambekar/ instagram
मनोरंजन

प्रसिद्ध व्यक्तीला डेट करत असल्याच्या चर्चांवर अखेर आर्या आंबेकरने सोडलं मौन

सोशल मीडियावर एक पोस्ट लिहित तिने काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत.

स्वाती वेमूल

गायिका आर्या आंबेकरच्या Aarya Ambekar सुरेल आवाजाची भुरळ सबंध महाराष्ट्राला पडली आहे. अवघ्या चार ते पाच वर्षांपासून आर्याने गायनाचं प्रशिक्षण घेतलं. सारेगमप लिटिल चॅम्प्समध्ये भाग घेतल्यानंतर ती प्रकाशझोतात आली. लिटिल चॅम्पनंतर तिने अनेक स्टेज शो केले आणि आपल्या अप्रतिम गायनकौशल्याने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं. गेल्या काही दिवसांपासून आर्याचं नाव एका प्रसिद्ध व्यक्तीसोबत जोडलं जात होतं. या चर्चांवर अखेर तिने मौन सोडलं आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट लिहित तिने काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. यावेळी आर्याने फेक फॉलोअर्स गोळा केल्याच्या आरोपांनाही उत्तर दिलं आहे.

फेक फॉलोअर्सच्या आरोपांवर उत्तर

'मी सोशल मीडियावर अनेक दिवसांपासून सक्रिय आहे. माझे सर्व फॉलोअर्स ऑरगॅनिक आहेत. फॉलोअर्ससाठी मी फेसबुक, इन्स्टाग्राम किंवा युट्युब यांना मी कधीच पैसे दिले नाहीत. फॉलोअर्स, सबस्क्राइबर्स, व्ह्यूज विकत घेण्याच्या संकल्पनेवर माझा विश्वास नाही. मी त्याविरोधात आहे आणि माझ्या नैतिकतेत ते बसत नाही. माझे सोशल मीडिया अकाऊंट मी स्वत: सांभाळते. प्रमोशन किंवा गाण्याच्या कार्यक्रमासंदर्भातील मेल किंवा मेसेजला मी स्वत: रिप्लाय देते', असं तिने स्पष्ट केलं.

अफेअरच्या चर्चांवर उत्तर-

'मी एका प्रसिद्ध व्यक्तीला डेट करत असल्याच्या चर्चा खूप दिवसांपासून आहेत. पण मी सर्वांना सांगू इच्छिते की ती व्यक्ती केवळ माझे मार्गदर्शक आहेत. मी त्यांचा आदर करते आणि पुढेदेखील करत राहीन', असं म्हणत तिने चर्चांना पूर्णविराम दिला.

आर्या सध्या सारेगमप लिटिल चॅम्प्स या शोमध्ये परीक्षकाच्या भूमिकेत आहे. तिने 'ती सध्या काय करते' या मराठी चित्रपटात काम केलं आहे. झी मराठी वाहिनीवरील काही मालिकांचं शीर्षकगीतदेखील तिने गायले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

झोपेतच घेतला अखेरचा श्वास! बॉलीवूड अभिनेत्रीचं २७ व्या वर्षी निधन, महिन्याभराने कुटुंबाने दिली माहिती

Kolhapur Circuit Bench : 'मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापूर खंडपीठ ही आता केवळ औपचारिकता उरली'; निवृत्त सरन्यायाधीश भूषण गवईंचे मोठे विधान

Police Humanity: पुलाखाली हरवलेली ती.. अन् खाकीतील देवदूत; नावाच्या एका धाग्यावरून कऱ्हाड पोलिसांची कामगिरी; कुटुंबाकडे केले स्वाधीन..

Marathi News Live Updates : पहिला श्रावणी सोमवार आणि नागपंचमीचा दुग्धशर्करा योग; त्र्यंबकेश्वरला भाविकांची अलोट गर्दी

Government Schools in Maharashtra: सरकारी शाळा बंद करण्याचा घाट; अभिजित दीपकेंची टीका; ‘सरकारी स्कूल ठीक करो’ अभियान सुरू

SCROLL FOR NEXT