aashay kulkarni, maza hoshil na, victoria movie SAKAL
मनोरंजन

Aashay Kulkarni: नुसता येडेपणा! कुत्रा समजून अभिनेत्याने आणलं डुकराचं पिल्लू

रागातच बाबानी झोपतेच आशयला बेदम मारलं

Devendra Jadhav

आशयने सांगितलं की, लहान असताना त्याने कुत्र्याचं पिल्लू समजून घरी डुकराचं पिल्लू उचलून आणलं होतं. त्या पिल्लाला बाल्कनीत ठेवून बिस्कीट वगैरे खाऊ घातलं होतं. रात्री झोपल्यानंतर जेव्हा त्याचे बाबा बाहेरून घरी आले तेव्हा त्यांना बाल्कनीतून कशाचा तरी आवाज आला. बाल्कनी उघडताच ते पिल्लू घरभर . इतकंच नव्हे तर त्या पिल्लाने देवगघरात शिरून सगळे देव पाडले. आणि इकडे तिकडे धावू लागले. पुढे रागातच बाबानी झोपतेच आशयला बेदम मारलं.

(aashay kulkarni had picked up a piglet at home mistaking it for a puppy)

आशयने मुलाखतीत हा किस्सा सविस्तर सांगितलं. आशयने लहानपणी कुत्र्याचं पिल्लू समजून डुकराच्या पिल्लाला घरी आणलेलं घेऊन आलो होतो. त्याने बिस्किट वगैरे खायला घालून त्याला बाल्कनीत ठेवलं होतं. मग रात्री आशयचे बाबा घरी आल्यानंतर त्यांना कुई कुई असा आवाज आला.

आशयच्या बाबांना वाटलं घरात उंदीर आहे. घरात शोध घेऊन त्यांनी बाल्कनीचा दरवाजा उघडला. ते पिल्लू बावचळल्यामुळे बाबांनी बाल्कनीचा दरवाजा उघडताच पिल्लाने घरात इकडेतिकडे पळायला सुरुवात केली. देव्हाऱ्यातील देवही त्याने अस्ताव्यस्त केले. पिल्लाने घरात नुसता हैदोस घातल्याने आशयचे बाबा प्रचंड रागावले होते. मग रात्री बाबांनी खोलीत येऊन झोपेतच आशयला मारायला सुरुवात केली. बाबांची भीती इतकी होती कि पुढच्या आयुष्यात आशयने कोणतंही पिल्लू घरात आणलं नाही.

आशय कुलकर्णीला आपण ‘पाहिले न मी तुला’, ‘किती सांगायचंय’ या मालिकांमधून प्रेक्षकांची मनं जिंकली. 'माझा होशील ना' मालिकेत आशयने साकारलेल्या निगेटिव्ह भूमिकांची खूप चर्चा झाली. आता आशय ‘व्हिक्टोरिया’ सिनेमातून अभिनयाची छाप पाडत आहे. या सिनेमात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, पुष्कर जोग मुख्य भूमिकेत आहेत. हा सिनेमा १३ जानेवारीला प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद सिनेमाला मिळतोय .

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Video : ''भारतात तुम्ही मला सुरक्षा देऊ शकत नाही का?'', राहुल गांधींची पोलिसांबरोबर बाचाबाची, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

Mumbai Health Report: राज्यात पावसाळी आजारांचा कहर; मुंबईत सर्वाधिक रुग्णांची नोंद

ब्रिटिशांच्या १८८१ व करवीर संस्थानच्या १९०२ च्या गॅझेटिरमध्ये मराठा व कुणबी एकच, तरीही मराठा समाजाला झगडावं लागतय; कोल्हापुरात आंदोलन पेटणार

Indira Ekadashi 2025: पूर्वजांना मुक्त करण्यासाठी महिलांनी काय करू नये, जाणून घ्या नियम

Latest Marathi News Updates : परतीच्या पावसामुळे पाणीपातळीत वाढ, मुंबईतील धरणांत ९८.८२ टक्के पाणीसाठा

SCROLL FOR NEXT