Arbaaz Khan Latest News esakal
मनोरंजन

Arbaaz Khan Reaction : 'सलमान खान सुपरस्टार आहे पण तो....' 'नेपोटिझम' वर अरबाजनं केलं मोठं विधान!

यापूर्वी देखील बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी नेपोटिझमवर (Arbaaz Khan Reaction) प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यात अरबाजच्या प्रतिक्रियेची चर्चा आहे.

युगंधर ताजणे

Arbaaz Khan Opens up about Struggles : बॉलीवूडचा भाईजान सलमान खानचा बॉलीवूडमधील दरारा हा अनेकांना माहिती आहे. तो जे काही बोलतो ते करुन दाखवतो हे याचा प्रत्यय अनेकांना आला आहे. या सगळ्यात त्याचा भाऊ अरबाज खाननं दिलेली प्रतिक्रिया ही चर्चेत आली आहे. त्यानं नेपोटिझमवर व्यक्त केलेलं मत हे खूप काही सांगून जाणारं आहे.

अरबाजनं एका मुलाखतीमध्ये बॉलीवूड आणि बॉलीवूडमधील नेपोटिझम यावर परखडपणे भाष्य केलं आहे. बॉलीवूडमध्ये बऱ्याच वर्षांपासून नेपोटिझमवर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया समोर आल्या आहे. आतले आणि बाहेरचे हा देखील बॉलीवूडमधील चर्चेचा विषय राहिला आहे. अशातच खुद्द अरबाजनं सलमानच्या नावाचे उदाहरण देत नेपोटिझमचं स्वरुन समजावून सांगितलं आहे. तो काय म्हणाला हे जाणून घेऊयात.

तुम्हाला सांगतो बॉलीवूडमध्ये जर तुम्हाला चमकायचे असेल तर तुम्हाला कुणीतरी गॉडफादर हवा असतो. मात्र तुम्हाला यशस्वी व्हायचे असल्यास तुमचे कष्ट फारच महत्वाचे आहेत. अनेकदा गॉडफादर नसूनही बॉलीवूडमध्ये यशस्वी झाल्याचे दिसून आले आहे. त्यानं सलमान आणि सोहेल खानचं उदाहरण दिलं आहे. बॉलीवूडमध्ये नव्यानं येणाऱ्या काही अभिनेत्यांवर नेपोटिझमचा आरोप हा नेहमीच केला जातो.

मला असे वाटते की, बॉलीवूडमधील प्रत्येकाचा संघर्ष वेगवेगळा आहे. त्यामुळे आपण त्याचा विचार करायला हवा. मला माहिती आहे की, मी देखील एका चित्रपटांची पार्श्वभूमी असलेल्या कुटूंबातून आलो आहे. अशावेळी माझाही संघर्ष मोठा राहिला आहे. डॉक्टरचा मुलगा हा डॉक्टर होतो. कारण त्याचे वडील डॉक्टर होतात. पण त्यातही त्याचा संघर्ष आहे.

अरबाज आणि सोहेल खान यांनी काही चित्रपटांमध्ये काम केले आहे. मात्र त्यांच्या चित्रपटाला म्हणावा असा प्रतिसाद मिळालेला नाही. टाईम आऊट विथ अंकित सोबत नेपोटिझमवर बातचीत केली आहे. अरबाज म्हणतो की, काही दरवाजे जसे उघडले जातात जेव्हा तुमचे वडील त्या प्रोफेशनमध्ये असतात. जसं की माझ्या फिल्मबाबत सांगता येईल. तुमचे वडील जर लॉ परिवारात आहे तर तुम्हालाही त्याचा फायदा होणार आहे.

माझे वडील हे स्क्रिप्ट रायटर होते तेव्हा त्यांच्या नावाचा आम्हाला फायदा होणार हे होतचं. मात्र तसं झालं नाही. कुणाला भेटणं सोपं होऊन जातं पण काम आम्हाला काही मिळालं नाही. सोहेल आणि मी किंवा दुसरे सुपरस्टार्स हे सलमान सारखे सक्सेसफुल नाहीत. मात्र तरीही आम्ही काम करतो आहोत. त्यात आनंदी आहोत. अशा शब्दांत अरबाजनं त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL 1st Test: गौतम गंभीरने खेळपट्टीची पाहणी केली, पाठ वळताच क्युरेटरने 'खेळी' खेळली; कॅप्टन, कोचने एकवटले... माईंड गेम

शूटिंगदरम्यान ज्युनिअर एनटीआरला झालेली गंभीर दुखापत; खांद्यावर झाली शस्त्रक्रिया, आता 2 ते 3 महिन्यांचा घेणार ब्रेक

IND vs SL: शुभमन गिल-रिषभ पंत श्रीलंकेत धुमाकूळ घालणार? WTC मध्ये आजपर्यंत कोणालाही न जमलेला पराक्रम करण्याची संधी

Latest Marathi News Live Update : तुम्ही मला अस्पृश्यासारखी वागणूक देता, 'शुद्धीकरण' करता आणि माझा अपमान करता."- खर्गे राज्यसभेत संतापले

‘Gift a Life After Life’! अवयवदानासाठी ५०० विद्यार्थ्यांचा पुढाकार; ‘Tree Of Life’मधून दिला जीवनाचा संदेश

SCROLL FOR NEXT