Abdu Rozik  Esakal
मनोरंजन

Abdu Rozik Video: अब्दूच्या हातात लोडेड गन! पोलिसांत तक्रार दाखल...काय आहे प्रकरण

Vaishali Patil

'बिग बॉस 16' द्वारे सर्वांची मनं जिंकणारा छोटा सिंगर अब्दू रोजिक नेहमीच चर्चेत असतो. त्याच्या गाण्यामुळे तर कधी त्याच्या व्हिडिओमुळे तो सर्वांच लक्ष वेधुन घेतो. मात्र सगळ्यांना हसवणारा अब्दू आता मोठ्या अडचणीत सापडला आहे.

त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये तो लोडेड बंदूकीने खेळतांना दिसत होता. त्याचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी त्याच्यावर प्रश्न उपस्थित केले. मुंबई पोलिसांकडे तक्रारही केली.

नुकतचं अब्दु रोजिकनं मुंबईतील अंधेरी येथे 'बुर्गीर' हे त्याच पहिलं रेस्टॉरंट सुरू केलं आहे. जिथे फराह खान, सोनू सूद, अर्चना गौतम आणि साजिद खान यांसारख्या अनेक स्टार्सचीही या कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी गोल्डन बॉईज सनी वाघचोरे आणि सनी गुर्जर हे देखील अब्दु रोजिकच्या रेस्टॉरंटमध्ये आले होते. गोल्डन बॉईजच्या बॉडीगार्डची बंदूक अब्दू रोजिकने हातात पकडली होती.

अंगरक्षकांकडे बंदूक बाळगण्याचा परवाना असतो मात्र तरीही अब्दूकडे ती बंदूक देणं आणि त्याच त्या बंदूकीसोबत खेळणं हे नेटकऱ्यांना काही पटलेलं नाही. यामुळे काहीही दुर्घटना घडू शकली असती, असं लोकांचे म्हणणे आहे.

तर दुसरीकडे अब्दूच्या टीममधील एकानं सांगितलं आहे की त्याने काही सेकंदांसाठीच ती बंदूक उचलली आणि ती नंतर लगेच खाली ठेवली, परंतु एकाने अब्दूची प्रतिमा खराब करण्याचा हेतूने संपूर्ण व्हिडिओमधून फक्त तो भाग हायलाइट केला आणि व्हिडिओ व्हायरल केला.

खोटे आरोप केल्याबद्दल अब्दू आता त्या व्यक्तीला कायदेशीर कारवाई करण्याचा विचार करत असल्याचंही त्याने सांगतिलं आहे. दरम्यान या संदर्भात पोलिस काही कार्यवाही करणार का याकडे लक्ष लागलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT