abhidnya bhave and mehul pai esakal
मनोरंजन

अभिज्ञा भावेची पतीला भक्कम साथ, कर्करोग थेरपी दरम्यान..

अभिनेत्री अभिज्ञा भावेच्या पतीला कर्करोगाचे निदान झाले असून सध्या त्याच्यावर उपचार सुरु आहेत. या उपचारा दरम्यान तणाव कमी करण्यासाठी त्यांनी एक खास खेळ खेळला आहे. त्याची व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. 

नीलेश अडसूळ

मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री अभिज्ञा भावे (abhindya bhave) सध्या कठीण प्रसंगातून जात आहे. सोशल मीडियावर सक्रिय असणारी अभिज्ञी अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना प्रभावित करते. तिचा पती मेहुल पै याला कर्करोगाचे निदान झाल्याचेही तिने कळवले होते. या घटनेने तिच्यावर अक्षरश: दु:खाचा डोंगर कोसळला. सध्या मेहूलवर कर्करोगाचे उपचार सुरु आहेत. या कठीण काळात अभिज्ञा मात्र खंबीरपणे त्याच्या पाठीशी उभी आहे. मेहूलचे मनोबल वाढवण्यासाठी ती प्रयत्न करत आहे.

अभिज्ञाने नुकताच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओत ती आणि तिचा पती मेहुल यांनी एक खेळ खेळला आहे. 'टेलिपथी' च्या माध्यामातून एकमेकांच्या मनातलं ओळखण्याचा हा खेळ आहे. ज्यामध्ये ते दोघेही यशस्वी होतात. आपण एकमेकांच्या मनातलं ओळखू शकतो याचा आनंद दोघांच्याही चेहऱ्यावर ओसंडून वाहत आहे.

हा व्हिडीओ शेअर करत तिने 'Thats how we treat our therapy days' असे कॅप्शन दिले आहे. 'आम्ही आमच्या थेरपीच्या दिवसात काहीसे असे वागतो', असं ती म्हटली आहे. त्यासोबत तिने #inbetweentheorapies असा हॅशटॅगही शेअर केला आहे. तिचा हा व्हिडीओ व्हायरल होच असून अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

‘तुम्ही दोघंही फार कमाल आहात. मला तुमच्या दोघांचाही प्रचंड अभिमान वाटतो.’ अशी कमेंट अभिज्ञा भावेची खास मैत्रीण मयुरी देशमुख हिने केली आहे. तर दुसरीकडे अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने ‘क्यूट’ अशी प्रतिक्रिया दिली आहे. त्यासोबत अनेक कलाकारांनी ‘तुम्हा दोघांना खूप खूप प्रेम', 'तुम्हाला लढण्यासाठी ताकद मिळो’, अशा कमेंटही दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fact Check : भारतीय संघ 'लूझर'..! IND vs PAK हस्तांदोलन प्रकरणावर रिकी पाँटिंगचं विधान Viral; पण हे खरंय का?

MP Nilesh Lanke: अहिल्यानगर जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्तांना तत्काळ मदत द्या : खासदार नीलेश लंके; 'चार दिवसांपासून मुसळधार पावसाने हाहाकार'

Latest Marathi News Updates : ससून डॉक वाचवा; कोळी बांधवांचा हक्क जपा!

Siddharth Shinde Death: Supreme Court मध्ये चक्कर आली आणि... सिद्धार्थ शिंदेंवर काळाचा घाला | Sakal News

Heavy Rain in Pimpri Chinchwad: पिंपरी चिंचवडमध्ये मुसळधार पाऊस; पावसामुळे नव्या खड्ड्यांची भर, मार्ग काढणेही अडचणीचे

SCROLL FOR NEXT