abhijeet sawant 
मनोरंजन

Indian Idol: "सिझन ११ मध्ये सर्वकाही फेक होतं"; अभिजीत सावंतचा खुलासा

'इंडियन आयडॉल १२' शोवर वाढतंय टीकांचं प्रमाण

स्वाती वेमूल

'इंडियन आयडॉल १२' Indian Idol 12 हा गाण्यांचा रिअॅलिटी शो सध्या फार चर्चेत आहे. स्पर्धकांच्या गायनकौशल्यापेक्षा शोवर होणारे आरोप, दिग्गज गायकांनी केलेली टीका यांमुळे या शोची चर्चा होत आहे. २००५ मध्ये या रिअॅलिटी शोचा पहिला सिझन प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिझनचा विजेता अभिजीत सावंत Abhijeet Sawant यानेसुद्धा आता शोवर टीका केली आहे. गाण्यांपेक्षा इतर गोष्टींवरच जास्त भर दिला जातो, असं त्याने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत म्हटलंय. (Abhijeet Sawant opens up about Indian Idol 12 controversies says everything was fake )

'बॉलिवूड लाइफ'ला दिलेल्या मुलाखतीत अभिजीत म्हणाला, "कार्यक्रमात गाण्यांव्यतिरिक्त जे काही दाखवलं जातं, त्याची मर्यादा आमच्या सिझनमध्ये फार कमी होती. पण सध्याच्या सिझनमध्ये त्याच एक्स्ट्रा एलिमेंट्सना जास्त महत्त्व दिलं जातंय. त्यांनी स्पर्धकांना आव्हानात्मक काम दिलं पाहिजे. पण जेव्हा तुम्ही गाण्यांव्यतिरिक्त इतर गोष्टींवर अधिक भर देता, तेव्हा गायनाचा दर्जा खालावत जातो. अशा रिअॅलिटी शोमध्ये गायनावर अधिक भर दिला पाहिजे."

या शोमध्ये दाखवल्या जाणाऱ्या अफेअर्सबद्दल अभिजीत व्यक्त झाला. "या सिझनबद्दल मला फारसं माहित नाही पण इंडियन आयडॉलच्या सिझन ११ मध्ये दाखवलेले अफेअर्स फेक होते. गायन आणि अशा गोष्टींमध्ये संतुलन असणं गरजेचं असतं. गायनामुळे स्पर्धकांची खरी ओळख ठरते, अशा खोट्या कथांमुळे नाही", असं तो म्हणाला. अकराव्या सिझनमध्ये सूत्रसंचालक आदित्य नारायण आणि परीक्षकाच्या भूमिकेत असलेली गायका नेहा कक्कर यांचं अफेअर असल्याचं दाखवण्यात आलं होतं. मात्र हे सर्व फक्त पब्लिसिटी स्टंट असल्याचं नंतर स्पष्ट झालं.

प्रसिद्ध गायिका सुनिधी चौहाननेही या शोवर टीका केली होती. 'स्पर्धकांचं कौतुक करा, त्यांची प्रशंसा करा, असं मला निर्मात्यांकडून सांगण्यात आलं होतं. मला हे न पटल्याने मी त्या शोला नकार दिला', असं ती म्हणाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Accident News : भीषण अपघात ! म्हशीला वाचवताना ४ वाहनांची धडक; ४ ठार, अनेक जखमी

Panchang 12 October 2025: आजच्या दिवशी आदित्य हृदय स्तोत्र पठण व ‘श्री सूर्याय नमः’ या मंत्राचा जप करावा

३७ वर्षांच्या संसारात कधीही अशोक सराफ 'ही' गोष्ट निवेदितांसमोर बोलले नाहीत; म्हणाल्या, 'नंतर त्याला विचारल्यावर...'

Latest Marathi News Live Update : शिवसेनेच्या उमेदवाराविरोधात काम केल्याची पालकमंत्री जयकुमार गोरे यांची कबुली; शहाजी पाटीलांचा पलटवार

CM Yogi Adityanath : सीएम योगींच्या 'स्वदेशी अभियाना'ला नवी भरारी; 'स्वदेशी मेळ्यां'मुळे कारागिरांची दिवाळी होणार समृद्ध!

SCROLL FOR NEXT