वादांशिवाय ज्या घरातलं पानही हलत नाही ते घर म्हणजे बिग बॉसचं(Big boss) घर. इथे टोकाचे वाद होतात ज्याचे पडसाद घराबाहेर उमटलेलेही पहायला मिळतात. यंदाच्या सिझन १५ ला फारसा टी.आर.पी मिळत नसल्यानं काही आक्रमक वृत्तीच्या माणसांना घरात सदस्य म्हणून दाखल करण्यात आलं त्यातील एक नाव होतं अभिजित बिचुकले(Abhijit Bichukale). या अभिजित बिचुकलेनं घरात जो उच्छाद मांडला होता तो आपण सगळ्यांनी पाहिला असेलच. त्यानं थेट सलमानला आव्हान दिले आणि घराबाहेर आल्यावरही तो सलमानविरोधात नको ती विधानं करत सुटला. त्यानं भाईजान विरोधात संताप व्यक्त करण्यासाठी थेट पत्रकार परिषदच आयोजित केली होती. त्याच पत्रकार परिषदेत त्यानं राज्यसरकार विरोधात जाणारं भाष्य केलं आहे. राज्यात सुरु होणाऱ्या 'वॉक इन स्टोअर' या राज्यसरकारच्या निर्णया संदर्भात त्याला प्रश्न विचारला असता त्यानं थेट मुख्यमंत्र्यांनाच सल्ला देण्याचा शहाणपणा केला आहे.
त्यानं राज्यसरकारच्या वाईनसंदर्भात घेण्यात आलेल्या 'वॉक इन स्टोअर' या निर्णयाचा विरोध करताना माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना म्हटले आहे,''उद्धवदादा तुम्ही बाळासाहेबांचे आचार आणि विचार विसरू नका. लोकांना तसंच आजच्या तरुण पिढीला व्यसनाधीन करू नका. तुम्ही किराणामालाच्या दुकानामध्ये-मॉल्समध्ये जर वाइन विकणार असाल तर याचे मी कधीही समर्थन करणार नाही. यामुळेच मी त्यांना सल्ला देईन की,जर तुम्हाला सगळीकडे काही विकायचं असेल तर अभिजित बिचुकले अॅन्ड सन्स स्वीट्सचे सातारी कंदी पेढे आहेत. ते द्या,कारण ते दुधाचे आहेत आणि त्या दुधातून माणसांना ताकद मिळेल आणि येणारी पिढी सुदृढ होईल'',असं अभिजित म्हणाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.