Abhinav Kohli Shweta Tiwari 
मनोरंजन

"मी दिलेले पैसे पचवतेसही आणि.."; श्वेता तिवारीला अभिनवचं प्रत्युत्तर

मुलावर एकही पैसा खर्च न केल्याचा श्वेताचा आरोप

सकाळ डिजिटल टीम

हिंदी मालिकांमधील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारी Shweta Tiwari तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. पती अभिनव कोहली Abhinav Kohli आणि तिच्यामधील वादविवादांची चर्चा सोशल मीडियावर नेहमी होत असते. श्वेता लवकरच 'खतरों के खिलाडी' या शोमध्ये भाग घेणार आहे. त्यासंबंधीत एका मुलाखतीमध्ये बोलताना श्वेताने अभिनववर आरोप केले होते. तेव्हा ती म्हणाली, "मी या शोसाठी केपटाऊनला रेयांश आणि माझ्या आईलासोबत आणलं असतं, पण अभिनवने यासाठी कोणतीही व्यवस्था केली नाही किंवा सहमती दिली नाही. मी रेयांशच्या सुरक्षेची काळजी घेत आहे. तर, दुसरीकडे अभिनव मुलांच्या खर्चासाठी एका पैशाची मदत करत नाही." श्वेताच्या आरोपाला प्रत्युत्तर देत अभिनवने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. (Abhinav Kohli slams Shweta Tiwari for claiming he has not spent a penny on son Reyansh)

"तू मुलाखतीत म्हणालीस की मी मुलांच्या संगोपनासाठी एक रुपया खर्च केला नाही. तुला जराही लाज वाटत नाही. जेव्हा मी अर्जुन बिजलानीसोबत शो केला तेव्हा जवळपास ४० टक्के मी माझ्या अकाऊंटमधून तुझ्या अकाऊंटला पैसे ट्रान्सफर केले होते. पैसे पचवतेसही आणि म्हणते मी पैसे खर्च करत नाही. तू एकटीच पैसे खर्च करतेस असं तू मुलाखतीत म्हणालीस. तू एकटीच पैसे खर्च करते का? श्वेता खोटं बोलणं थांबव. तू जर मला इतके कॉल केले होतेस तर जरा कॉल रेकॉर्ड दाखव. इथे कोरोना महामारी सुरू आहे. लोक कसेबसे जगत आहेत आणि तू सगळं सोडून केपटाउनला गेलीस. कोरोनाची ही लाट तर लहान मुलांसाठी जास्त धोकादायक आहे. अशा वेळेत तू सर्व काही सोडून गेली कारण तुला फक्त पैसै कमवायचे आहेत. पैशाची एवढी कमतरता भासली की तू महामारीत मुलाला सोडून गेलीस?", अशा शब्दांत अभिनवने सुनावले.

हेही वाचा : सलमानचा बॉडीगार्ड 'शेरा'ला मिळतो इतका पगार

श्वेताने केलेले सर्व आरोप अभिनवने फेटाळले आहेत. तसेच या व्हिडीओमधून त्याने श्वेतावर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे देखील सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Weather Update : पुणे आणि राज्यात 'थंडी'ची चाहूल; मध्य महाराष्ट्रासह कोकण-गोवा, विदर्भ, मराठवाड्यातही पारा खाली

Uddhav Thackeray: शेतकरी उद्‌ध्वस्त, सरकारकडून विकासाच्या गप्पा: पक्षप्रमुख उद्धव ठाकरे; बार्शी तालुक्यातील घारीत शिवसेनेचा संवाद दौरा

Jalgaon Bus Accident : जळगावमध्ये ट्रॅव्हल्स बस अन् टॅंकरचा भीषण अपघात, एकाचा जागीच मृत्यू , ७ गंभीर जखमी

Brazilian Model Larissa: मतदानातील '२२' चा मॅजिक! राहुल गांधींचा Viral Claim पाहून ब्राझिलियन मॉडेल म्हणाली, ‘ भारतात हे काय चाललंय?'

माेठी बातमी! 'मैत्रिणीचा खून केल्याचे सांगत तो पोलिस ठाण्यात हजर';मृतदेह टाकला नदीत, सांगली पाेलिस यंत्रणा हादरली

SCROLL FOR NEXT