abhishek 
मनोरंजन

फराह खानच्या मुलीने काढलेल्या एका चित्रासाठी अभिषेकने दिले चक्क एक लाख रुपये

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कोरोना विषाणूच्या वाढता संसर्ग पाहता त्याचा सामना करण्यासाठी नामवंत चेहरे समोर येत आहेत. एकूणच सरकारला मदत करण्यासाठी प्रत्येक जण आपापल्या परीने मदतीचा हात पुढे करत आहेत. भारताची स्थिती गंभीर होत चालली आहे. या विषाणूला संपविण्यासाठी अनेक कलाकार पुढे आले आहेत. यामध्ये कोणी आर्थिक मदत करत आहे तर कोणी अन्न-धान्य आणि खाद्य पदार्थांची मदत करत आहेत. याशिवाय काहींनी पंतप्रधान सहाय्यता निधीला मदत केली आहे. कलाकारांप्रमाणे आता सेलिब्रिटी किड्स देखील मदतीसाठी पुढे येत आहेत. प्रसिद्ध बॉलिवूड नृत्यदिग्दर्शिका आणि दिग्दर्शक फराह खानची मुलगी अन्या देखील मदतीसाठी पुढे आली आहे.

काही दिवसांपूर्वीच फराहने तिची मुलगी चित्र काढून ते विकणार असून त्यातून मिळालेले पैसे ती कोविड-19 च्या चॅरीटीसाठी देणार असल्याचे सांगितले होते. अन्याच्या या चॅरिटी ड्राईव्हमध्ये आता अभिनेता अभिषेक बच्चन देखील सामील झाला आहे. अभिषेकने अन्याला एका चित्राचे एक लाख रुपये दिले आहेत.

फराहने काही दिवसांपूर्वी तिची १२ वर्षांची मुलगी चित्र काढून ते विकून कोरोनाच्या चॅरिटी ड्राईव्हसाठी वापरणार असल्याचे सांगितले होते. त्यासाठी आता अभिषेक बच्चननेही अन्याला मदत केली आहे. त्याने तिला एका चित्राचे एक लाख रुपये दिले आहेत. अभिषेकने अन्याला मदत केल्याने फराह खूपच खुश आहे. तिने अभिषेकने केलेल्या या मदतीसाठी त्याचे आभार देखील मानले आहेत. खरं तर अभिषेकने एका चित्रासाठी एक लाख रुपये दिल्याचे ऐकून सारे जण आश्चर्यचकित झाले आहेत. पण हे पैसे त्याने डोनेशन म्हणून दिले आहेत. फराहने त्याचे आभार मानत इंस्टाग्रामवर तिचा आणि अभिषेकचा एक फोटो शेअर केला आहे. या पोस्टमध्ये फराहने लिहिले आहे की, 'एका चित्रासाठी एक लाख रूपये कोण देत? फक्त बच्चन...याने अन्याच्या चॅरीटीमधील ड्राईव्हचे पैसे दुप्पट झाले आहे. थँक्यू. मोठ्या मनाचा मुलगा.' याशिवाय तिने तिची मुलगी आणि तिच्या चित्राचा फोटो देखील शेअर केला आहे.
याआधी अन्याने पाळीव प्राण्यांचे चित्र काढून जवळजवळ एक लाख रुपये जमा केले होते. तिने या पैशांचा उपयोग भटक्या कुत्र्यांच्या मदतीसाठी केला होता.

abhishek bachchan helps farah khans daughter to raise funds

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Meenakshi Shinde: ‘नाव घेतल्याने कोणी आरोपी ठरत नाही : मीनाक्षी शिंदे; ‘तपास होऊ द्या, सत्य बाहेर येईल’ शिंदेंचा पलटवार

Dino Morea: राहत्या घरातून डिनो मोरियाला अटक! मिठी नदी गैरव्यवहार प्रकरणाने अभिनेत्याच्या अडचणी वाढल्या

ST NCMC Card: तिकिटाचे पैसे कटल्यानंतर पुन्हा ६० रुपये गायब;एनसीएमसी कार्डचा पहिल्याच दिवशी फटका, ज्येष्ठाची तक्रार

Latest Marathi News Live Update : ठाण्यातील गुंडगिरीला अमित शहा जबाबदार- संजय राऊत

Ravikiran Ingawale : 'शरद कोराणे यांना कारागृहात इंजेक्शन देऊन संपवलं...'; रविकिरण इंगवलेंच्या व्हायरल ऑडिओमुळे खळबळ, कोराणे कुटुंबाची सखोल चौकशीची मागणी

SCROLL FOR NEXT