Abhishek Bachchan  esakal
मनोरंजन

Bollywood News: 'करिश्मा-अभिषेकचं लग्न शक्यच नव्हतं', काय होतं कारण?

प्रसिद्ध अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांचे लग्न होणार हे जवळपास निश्चित झाले होते असे सांगितले जाते.

सकाळ डिजिटल टीम

Abhishek Bachchan Karishma Kapoor: प्रसिद्ध अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांचे लग्न होणार हे जवळपास निश्चित झाले होते असे सांगितले जाते. मात्र ते लग्न होणं काही शक्य नव्हतं. असा धक्कादायक खुलासा प्रख्यात निर्माते आणि दिग्दर्शक सुनील दर्शन यांनी केला आहे. त्यामुळे एक नवी माहिती आता चित्रपट चाहत्यांसमोर आली आहे.

करिश्मा आणि अभिषेक यांची जोडी २००० च्या दरम्यान लाईमलाईटमध्ये आली होती. या दोन्ही सेलिब्रेटींचे प्रेमप्रकरण हे चर्चेत आले होते. ही जवळीक एवढी वाढली की, त्यामुळे त्यांच्या लग्नाची जोरदार चर्चाही रंगली होती. लग्नाच्या चर्चेला आलेलं उधाण ही दोन्ही सेलिब्रेटींच्या चाहत्यांसाठी वेगळीच बातमी होती. मात्र तसं काही होणार नव्हतं असं दर्शन यांनी म्हटलं आहे. हा मैंने भी प्यार किया है....या चित्रपटामध्ये अभिषेक आणि करिश्मा काम केले होते.

दर्शन यांनी बॉलीवूड हंगामाला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये म्हटले आहे की, मलाही या दोन्ही सेलिब्रेटींच्या प्रेमप्रकरणानं धक्का दिला होता. त्यांच्या लग्नाच्या चर्चेनं तर आणखी विचार करण्यास भाग पाडलं होतं. २००२ मध्ये आलेल्या हा मैंने भी प्यार किया है या चित्रपटाचे दिग्दर्शन धर्मेश दर्शन यांनी केले होते. त्याची निर्मिती सुनील दर्शन यांनी केली होती. त्यावेळच्या आठवणींना दर्शन यांनी उजाळा दिला आहे. ते म्हणाले, तो चित्रपट आमच्यासाठी खास होता. आव्हानात्मकही होता.

बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट काही खास कमाई करु शकला नाही. दर्शन म्हणाले, अभिषेक आणि करिश्मा लग्न करणार ही काही अफवा नव्हती. ती खरीच गोष्ट होती. मात्र ते लग्न काही होऊ शकलं नाही. कुठल्याशा कारणास्तव त्यांच्यातील वाद हा वाढत गेला. आणि त्याचा परिणाम लग्न करण्याच्या निर्णयावर झाला. साखरपुड्याच्या कार्यक्रमाला मी हजर होतो. तो वाद आणि अभिषेक आणि करिश्मा यांनी पुन्हा कधीही एकत्र काम केले नाही. अशी आठवण दर्शन यांनी यावेळी सांगितली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT