Ghoomar Trailer Out  Esakal
मनोरंजन

Ghoomar Trailer Out:'एक हात तुटला तर दुसऱ्या हातानं गाजवलं मैदान' अभिषेक बच्चन आणि सैयामीच्या "घूमर" चा ट्रेलर लाँच !

अभिषेक बच्चन आणि सैयामी खेर आणि आर. बाल्की दिग्दर्शित "घूमर" चा ट्रेलर लाँच

Vaishali Patil

बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन आणि सैयामी खेर यांचा आगामी बहू चर्चित 'घूमर' या चित्रपटाचा ट्रेलर आज रिलिज करण्यात आला आहे. यात प्रेक्षकांना अनोख्या भावना, प्रेरणा आणि परिवर्तनात्मक कथेचा अनुभव येणार आहे.

या ट्रेलब्लॅझिंग सिनेमॅटिक चित्रपटात अभिषेक बच्चन एका प्रशिक्षकाची व्यक्तिरेखा साकारत आहे. त्याच्या आयुष्याला अनपेक्षित वळण तेव्हा येते, जेव्हा तो पॅराप्लेजिक खेळाडूला ट्रेन करताना दिसतोय. या खेळाडूची भुमिका सैयामी खेर साकारणार आहे. सैयामी या चित्रपटात डाव्या हाताने खेळणाऱ्या क्रिकेटपटूची भूमिका साकारत आहे.

ट्रेलरची सुरुवात अभिषेक बच्चनच्या डायलॉगने होते जो मद्यधुंद अवस्थेत दिसतो. सैयामी खेर जी अंगदच्या प्रेमात आहे. पण तिच्यासाठी क्रिकेट हे तिच्या प्रेमापेक्षा जास्त महत्त्वाचे आहे. सैयामीची भारतीय संघात निवड झाल्यानंतर तिच्या आयुष्यात वादळ येते आणि एका अपघातात तिचा एक हात तिला गमवावा लागतो. त्यानंतर तिच्या संघर्षाची कहानी सुरु होते.

अमिताभ बच्चन यांनी मुलाच्या चित्रपटाचा ट्रेलर शेयर करत लिहिलं की, हा ट्रेलर मन हेलावणारा आहे.

ही कथा राहुल सेनगुप्ता आणि ऋषी वीरमानी यांच्यासोबत लिहिली आहे. हंगेरियन उजव्या हाताची नेमबाज कॅरोली टाक्स हिच्या कथेपासून प्रेरित आहे, ज्यात तिच्या दुसऱ्या हाताला गंभीर दुखापत झाल्यानंतर तिने डाव्या हाताने खेळून दोन ऑलिम्पिक सुवर्णपदके जिंकली होती.

आर बाल्की लिखित आणि दिग्दर्शित घूमरमध्ये अभिषेक बच्चन, अंगद बेदी, शबाना आझमी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. शिवेंद्र सिंग आणि इनवाका दास हे या चित्रपटातून पदार्पण करत आहे.

"घूमर" च्या ट्रेलरने सोशल मीडिया वर धुमाकूळ घातला असून हा चित्रपट पुन्हा भारतातील क्रीडा चित्रपटांना एका वेगळ्या उंचीवर नेणार असा विश्वास निर्मात्यांना आहे. " घूमर" हा आर. बाल्की यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट असून त्यांनी "चीनी कम," "पा," आणि "पॅड मॅन" सारख्या प्रशंसित चित्रपटाच दिग्दर्शन देखील केलं आहे.

आर. बाल्की दिग्दर्शित आणि होप प्रॉडक्शन आणि सरस्वती एंटरटेनमेंट निर्मित आहे "घूमर" 18 ऑगस्ट 2023 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT