Abdu Rozik reveals harsh trolling people call me kachra, motivates mc stan Google
मनोरंजन

Big Boss 16: लोकांनी अब्दूला 'कचरा' म्हटलं, पण त्याने एकाच उत्तरात सगळ्यांची...

'बिग बॉस १६' च्या घरात सध्या अब्दू रोझिक हा १९ वर्षीय स्पर्धक आपल्या समजूतदार वागण्यानं सगळ्यांचीच मनं जिंकताना दिसत आहे.

प्रणाली मोरे

Big Boss 16: बिग बॉस १६ च्या घरातील एक सदस्य सध्या सगळ्यांचेच मन जिंकण्यात यशस्वी होतोय. सलमान खान च्या या चॅट शो मध्ये अब्दूनं पहिल्या दिवसांपासून सगळ्यांच्या मनात घर बनवलंय. अब्दू रोझिक १९ वर्षांचा आहे,पण कमी वयात असलेला त्याच्यातील समजूतदारपणा सगळ्यांनाच हैराण करुन सोडतोय. छोट्या उंचीच्या लहानग्या अब्दूचा आयुष्याकडे सकारात्मकतेने पाहण्याचा दृष्टिकोन चाहत्यांना त्याच्या प्रेमात पाडायला मजबूर करतोय. गेल्या एपिसोडमध्ये अब्दूनं रॅपर एमसी स्टॅनला आपल्या अनुभवातून आलेल्या ज्ञानानं खूपच प्रेरित केलेलं दिसून आलं.(Abdu Rozik reveals harsh trolling people call me kachra, motivates mc stan)

एमसी स्टॅन आणि अब्दू रोझिक दरम्यान खूप मजेदार असे क्षण बिग बॉसच्या घरात पहायला मिळाले. बिग बॉसच्या घरात सध्या रॅपर एमसी स्टॅन खूप अस्वस्थ वाटतोय. तो कुठल्याही अॅक्टिव्हिटीमध्ये खूप कमी सहभाग घेताना दिसत आहे. या आठवड्यात एमसी स्टॅनला एलिमिनेट देखील करण्यात आलं आहे. स्वतःला एलिमिनेशनपासून वाचवण्यासाठी बिग बॉसने एक संधी त्याला दिली होती. पण रॅपरला त्या संधीचा फायदा घेता आलेला नाही. आणि तो आता खूप नाराज आहे आणि शो मधून आपण बाहेर पडू असं देखील त्याला वाटत आहे. त्याचवेळी अब्दू रोझाक त्याच्याजवळ जातो आणि त्याला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करताना दिसतो.

पण एमसी स्टॅनला प्रोत्साहित करता करता अब्दू अचानक भावूक होतो. तो म्हणतो,''सोशल मीडियावर त्याला आधी खूप ट्रोल केलं जायचं. खूप हीन दर्जाच्या कमेंट्स त्याला आजही मिळतात. पण असं असून देखील तो खूप सकारात्मक मनःस्थितीत राहण्याचा प्रयत्न करतो. आयुष्याकडे त्याच्या पाहण्याचा दृष्टिकोन तो कधीच नकारात्मक ठेवत नाही''. अब्दू पुढे म्हणाला, ''मला कुणी कचरा म्हणायचं,खूप घाणेरड्या भाषेत लोक माझ्यासाठी कमेंट करायचे. पण याच सगळ्या गोष्टी मला आणखी स्ट्रॉंग बनवतात''.

''आयुष्यात नेहमीच आपल्या पदरी सुख येईल असं नाही. काही दुःखाचे क्षणही आपल्या झोळीत पडतील. मला बिग बॉसच्या घरात राहणं आवडतंय कारण मी इथे आल्यापासून वेगवेगळ्या स्वभावांच्या लोकांना भेटलो,त्यांना जवळून अनुभवणं मला आवडू लागलंय. त्यांच्याकडून जे खूप वेगवेगळ्या गोष्टींविषयी कळतंय ते देखील माझ्या ज्ञानात भर घालतंय. बाहेर सर्व मला अब्दू रोझिक नावानं ओळखतात, बोहर माझ्याकडे सेलिब्रिटी म्हणून आज पाहिलं जातं. पण इथे बिग बॉसच्या घरात आपण सगळे एकसारखे आहोत. इथे आपण काम करतोय, अगदी घरातलं पडेल ते काम. तुम्ही कायम सुपरस्टार राहू शकत नाही. आणि कायम तुमच्याकडे पैसा येईल असंही होऊ शकत नाही. तसंच, कायम तुमच्या आजुबाजूला तुम्हाला हवी असतील अशीच लोक वावरतील असंही कधीच होणार नाही''.

बिग बॉसच्या त्या एपिसोडमध्ये अब्दूलचं हे बोलणं सर्वांनाच खूप भावलं. लोकांचं मन जिंकण्यात तो यशस्वी झाला, घरातच नाही तर घराच्या बाहेर देखील अब्दूचीच चर्चा आहे. सोशल मीडियावर अब्दू जोरदार ट्रेंडिंगला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: मुंबईत खळबळ! मध्यप्रदेशातील तरुण मराठा आंदोलनात घुसला अन्..., मराठ्यांनी रंगेहात पकडलं, व्हिडिओ पाहा

Whatsapp New Feature : व्हॉट्सअ‍ॅपमध्ये झाली कलरफुल फीचरची एन्ट्री; कसं वापरायचं? पहा एका क्लिकवर

Narhari Zirwal : शेतकऱ्यांचे कर्ज आणि व्याजमाफीसाठी थेट मुख्यमंत्र्यांशी बैठक; मंत्री झिरवाळांचे आश्वासन

Latest Marathi News Updates: हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे - न्यायमूर्ती

Maratha Reservation: 'मुंबईतील आंदोलकांसाठी शिदोरी रवाना'; बारडगाव सुद्रिक, भांबोरा, कानगुडवाडी ग्रामस्थांचा पुढाकार

SCROLL FOR NEXT