gehana vasistha news social media viral 
मनोरंजन

तिरंग्याचा अपमान करणारी गहना वशिष्ठ आहे कोण ?

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - गंदी बात सारख्या वेबसीरिजमधून प्रसिध्द झालेली अभिनेत्री व मॉडेल गहना वशिष्ठ सध्या भलतीच चर्चेत आली आहे. त्याचे कारण म्हणजे तिच्यावर एका वेबसाईटवर अॅडल्ट व्हिडिओ अपलोड केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्याप्रकरणी तिला अटकही करण्यात आली आहे. यापूर्वीही गहना चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात तिचा फॅन फॉलोअर्स आहे. वाद विवाद तिला नवे नाहीत. मात्र त्याची मोठी किंमत तिला चूकवावी लागली आहे. आता गहना पुन्हा एकदा वादाच्या भोव-यात सापडली आहे. त्यावरुन तिच्यावर टीकाही होताना दिसत आहे.

अभिनेत्री गहना वशिष्ठचे खरे नाव वंदना तिवारी आहे. तिचा जन्म छत्तीसगढ मधील चिमरी या गावी झाला. गहनाला सुरुवातीपासूनच अभिनय आणि मॉंडेलिंगमध्ये कमालीचा रस होता. तिनं 2012 मध्ये मिस एशिया बिकिनीचा किताबही जिंकला होता. गहनानं अनेक जाहिरातींमध्ये काम केले आहे. तिनं काही हिंदी आणि तमिळ चित्रपटांमध्ये काम केले करुन प्रेक्षकांमध्ये आपली ओळख निर्माण केली आहे. गहनाचा वेगळा प्रेक्षकवर्ग आहे. गंदी बातच्या माध्यमातून तिनं लोकप्रियता मिळवली आहे. यापूर्वी तिनं एक फोटोशुट केले होते. त्यामुळे तिला मारही खावा लागला होता.

2020 मध्ये गहनाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यामुळे जास्त चर्चेत आली होती. सोशल मीडियावर तो व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला. त्यात आपल्या कमरेच्या खाली तिरंगा लावल्याचे दाखविण्यात आले होते. या प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटले. आणि गहना वादात सापडली. तिला मारहाणही झाली होती. तिचा त्या फोटोतील अंदाज भलताच एरॉटिक होता. जेव्हा तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला तेव्हा मोठी खळबळ उडाली होती. मुंबईत गहनाला मारहाण झाली होती. त्यावर आपली बाजू मांडताना गहना म्हणाली  होती की, तो व्हिडिओ मी नव्हे तर माझ्या मित्रानं अपलोड केला आहे. त्यावेळी त्या प्रकरणाला तिचा एकप्रकारचा पब्लिसिटी स्टंट म्हटले गेले होते.

2019 मध्ये गहना चित्रिकरणाच्या वेळी आजारी पडली होती. त्यामुळे तिला एका रुग्णालयात दाखल करावे लागले होते. तेव्हा गहना काही न खाता तास न तास काम करत होती. त्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करावे लागले होते. त्याचा परिणाम असा झाला की, गहना बेशुध्द झाली होती. डॉक्टर म्हणाले होते की, तिला रुग्णालयात दाखल करण्यासाठी थोडा उशीर झाला असता तर तिचं वाचणं कठीण होते. अल्ट बालाजीच्या वतीनं प्रदर्शित करण्यात आलेल्या गंदी बात या वेबसीरिजमध्ये तिनं काम केलं होतं. याबरोबरच तिनं स्टार प्लसच्या बहने या मालिकेतही काम केले होते. आतापर्यत गहनानं 70 ते 80 जाहिरातींमध्ये काम केले असून 30 साऊथच्या चित्रपटांमध्ये ती झळकली आहे. 2015 च्या वर्ल्डकपमध्ये योगराज सिंग आणि अतूल वासन यांच्याबरोबर एक शो होस्टमध्येही ती चमकली होती. 
 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mohan Bhagwat: ७५ वर्षांसंबंधीचं 'ते' विधान भागवतांनी नेमकं का केलं? संघाकडून स्पष्टीकरण, विरोधकांचा मोदींवर रोख

Manchar News : काय सांगता! वृद्ध महिलेचे घरच गेले ‘चोरीला’; न्यायासाठी धावपळ सुरू

Latest Marathi News Updates : नाशिक जिल्हा परिषदेतील उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलंबित

Palghar News: वसई-विरारमध्ये नालासोपाऱ्यात अमली पदार्थांचा पर्दाफाश, 12 आरोपी अटक

IND vs ENG 3rd Test: 'चेंडू'वरून रामायण! शुभमन गिलचं वाद घालणं चुकीचं नव्हतं; अम्पायरने काय केले, ते वाचाच...

SCROLL FOR NEXT