acrtress rhea Chakraborty dropped from chehre new teaser date tweet has no mention of actress 
मनोरंजन

रिया 'चेहरे' तून बाहेर?; नव्या टीझरमध्ये तिच्या नावाचा उल्लेख नाही 

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई -  दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपुत याची मैत्रीण अशी ओळख असणा-या रियाला चेहरे नावाच्या चित्रपटातून पायउतार व्हावे लागल्याची चर्चा सुरु झाली आहे. या चर्चेला मिळालेले खतपाणी म्हणजे सध्या चित्रपटाचा नवा टीझर आला आहे. तसेच जो पोस्टर आहे त्यात तिच्या नावाचा उल्लेख नसल्याचे दिसून आले आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन, इमरान हाश्मी या कलाकारांचा समावेश आहे. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चेला उधाण आले आहे.

सध्या जे नवीन पोस्टर व्हायरल झाले आहे त्यात महानायक अमिताभ बच्चन, इमरान हाश्मी यांचे फोटो आहेत. तो पोस्टर आज प्रदर्शित झाला आहे. त्यातुन पुन्हा एकदा रियाला वगळण्यात आल्याची चर्चा सुरु झाली आहे. अभिनेता इमरान हाश्मीनं व्टिटरवर एक फोटो शेअर केला आहे. तसेच त्याच्या टीझरची तारीखही सांगितली आहे. त्याशिवाय त्यानं त्या चित्रपटाच्या कास्ट आणि क्रु ला ती पोस्ट टॅग केली आहे. मात्र त्यात रियाचे नाव नाही. त्यामुळे आणखी वेगवेगळ्या प्रश्नांना तोंड फुटले आहे. वास्तविक चेहरे नावाचा सिनेमा हा जुलै 2020 मध्ये प्रदर्शित होणार होता. मात्र कोरोनामुळे त्याचे प्रदर्शन लांबले.

आता हा चित्रपट 30 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. तर त्याचा टीझर हा मार्च 11 ला प्रदर्शित होणार आहे.  इमरानं आज या चित्रपटाचा पोस्टर शेअर केल्यानंतर सगळ्याचे लक्ष रिहाकडे गेले आहे. इमराननं तो पोस्टर सहकारी अभिनेते अमिताभ बच्चन, चित्रपट निर्माता आनंद पांडे, दिग्दर्शक रुमी जाफ्री, क्रिस्टल डीसुझा, सिध्दार्थ कपूर, अन्नु कपूर, रघुबीर यादव, ध्रितीमन चॅटर्जी यांना टॅग करण्यात आले आहे. यावेळी इमराननं रियाचे नाव या यादीतुन वगळले आहे.

इमराननं लिहिलं आहे की, चांद चेहरे, हजारो राज, हर चेहरा कुछ कहता है, और बहुत कुछ छुपाता है. चेहरे हा चित्रपट येत्या 30 एप्रिल 2021 मध्ये आपल्या भेटीला येणार आहे. तर त्याचा टीझर 11 मार्चला सोशल मीडियावर प्रदर्शित होणार आहे. केवळ इमरानं नाहीतर अमिताभ यांनीही आपल्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर चेहरेविषयी लिहिलं आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

New Year's Eve : भारताआधी २९ देशांत होणार नवीन वर्षाचे स्वागत, जगभरात नववर्षाचे आगमन २६ तास सुरू राहणार, काय असतो टाईम झोन ? जाणून घ्या

Gold Silver Price Today : वर्षाच्या शेवटी सोने, चांदीचा दरात घसरण होणार!, चांदी वाढली सोने दरात घट...

Emergency Case मध्ये मध्यरात्रीही न्यायालय उघडणार; CJI Suryakant यांच्या ‘या’ प्लॅनमुळे संपूर्ण न्यायव्यवस्थेत मोठा बदल!

Pune News:'हडपसरच्या तीन प्रभागातून ३४८ उमेदवारी अर्ज दाखल'; ए-बी फॉर्म वाटपात आयात उमेदवारांना प्राधान्य, सर्वच पक्षांमधून नाराजीचे सूर..

Latest Marathi News Update : उत्तर भारतात थंडीचा विमानसेवेला फटका, पुण्यात ३ उड्डाणं रद्द

SCROLL FOR NEXT