active group make cultural and social dramas to aware people rajya natya mahotsav
active group make cultural and social dramas to aware people rajya natya mahotsav Sakal
मनोरंजन

निरंतर कृतिशील

सकाळ वृत्तसेवा

‘ज्याला पावलापुरता प्रकाश दिसतो, त्याला आपले संपूर्ण आयुष्य उजळून टाकणे त्या प्रकाशातच शक्य होते. आमच्या झिजण्याने, जळण्याने तुमची पाऊलवाट प्रकाशित होत असेल तर असे जळणे आम्हाला मंजूर आहे,’

या ध्येयवाक्याने ३० सप्टेंबर १९८४ रोजी ॲक्टिव्ह ग्रुपची स्थापना झाली. सांगलीच्या शैक्षणिक-सामाजिक क्षेत्रासह सांस्कृतिक क्षेत्रात, त्यातही नाट्यक्षेत्रात संस्थेने भरीव असे योगदान दिले. अनेक नवोदितांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले.

- श्रीनिवास जरंडीकर, सांगली

गेल्या ४० वर्षांत ॲक्टिव्ह ग्रुपने सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रम राबवले. इथे प्रामुख्याने आणि त्यातही नाट्य क्षेत्राचा आढावा घेण्याचा प्रयत्न आहे. १९९५ पासून सामाजिक कार्यामध्ये भर म्हणून संस्थेने सांस्कृतिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर काम करायला सुरवात केली.

महेशभाई शहा, रमेशभाई त्रिवेदी, अरुण दांडेकर, अशोक ताम्हणकर, प्रभाकर वेलणकर, चंद्रकांत पाटील, उदय परांजपे, सुधीर गाडगीळ, उमा परांजपे, प्रा. सर्जेराव गायकवाड, प्रकाश आपटे, महेश कराडकर, मधू वझे, वीणा वझे यांसारखी मंडळी ग्रुपच्या स्थापनेत पुढे होती.

सुरवातीला महाराष्ट्र शासनाच्या राज्य नाट्य महोत्सवात संस्थेने सहभाग घेतला १९९५-९६ मध्ये ३५ व्या राज्य नाट्यमहोत्सवात संस्थेतर्फे ‘अश्मपुष्प’ हे पहिले नाटक सादर झाले. दिग्दर्शन चेतना वैद्य यांचे होते. या नाटकामध्ये विद्या कुलकर्णी, अंकुश जोशी,

जनार्दन लिमये, गोविंद गोडबोले, वैभव कुलकर्णी, गौरी कुलकर्णी, राजलक्ष्मी देवल, अर्चना कुलकर्णी, विद्याधर मगदूम, हरी महाबळ, देवदत्त करमरकर, कल्लाप्पा वाघमोडे, गजानन पळसोदकर, पंकज जोशी, नीना मेस्त्री-नाईक अशी मंडळी होती.

या नाटकासाठी नीना मेस्त्री-नाईक यांना स्त्रीअभिनयाचे प्रमाणपत्र मिळाले. १९९६-९७ मध्ये ‘अखेर पडदा पडला’ हे श्रीनिवास जरंडीकर लिखित आणि दिग्दर्शित नाटक सादर झाले. यावेळी निर्मितीसह दिग्दर्शन,

नेपथ्य, प्रकाशयोजना आणि उत्तम अभिनय यासाठी प्रथम क्रमांकाची पारितोषिके प्राप्त झाली. अनेक नवोदित कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध झाले. तौफिक शिवानी, विजय धामणीकर, अभिजित कुलकर्णी, सुरेश विभूते, हेमंत खाडिलकर, शशांक नातू, केदार आपटे, सचिन कुलकर्णी, यशवंत कुलकर्णी, धनश्री कुष्टे-कुलकर्णी, जितेंद्र दळवी, गजानन यादव आदी कलाकारांनी सहभाग घेतला.

सांगली येथे १९९७ मध्ये झालेल्या राजनेमी कला महोत्सवात संस्थेने ‘निष्फळ’ ही एकांकिका सादर केली. यामध्ये प्राची गोडबोले यांना स्त्रीअभिनयाचे, तर मुकुंद पटवर्धन यांना प्रकाश योजनेचे पारितोषिक प्राप्त झाले.

याच एकांकिकेचा नाट्यप्रयोग इचलकरंजी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती करंडक एकांकिका स्पर्धेत झाला. या स्पर्धेमध्ये संस्थेला सांघिक आणि तीन वैयक्तिक पारितोषिके प्राप्त झाली. १९९७ मध्ये ‘जोगीयासे’ हे नाटक संस्थेने राज्य नाट्य महोत्सवात सादर केले होते. सांघिक पारितोषिकासह त्यालाही चार पारितोषिके मिळाली.

या नाटकात जुई बर्वे, केदार आपटे आणि प्रसाद गद्रे यांच्यासह संस्थेला सांघिक पारितोषिक मिळाले. २००० मध्ये ‘जीवन गाणे’ हे नाटक स्पर्धेत चांगलेच गाजले. त्या वेळी नीता जोशी यांना अभिनयाचे प्रमाणपत्र मिळाले.

या नाटकाचे प्रसारण ‘आकाशवाणी सांगली’वरून झाले. नंतरच्या टप्प्यात ‘हवा अंधारा कवडसा’, ‘अमिबाची डायरी’, ‘शामेलियॉन’, ‘तो येणाराय’, ‘क्राइम पॅशनल’, ‘आदर साईड ऑफ मिड नाईट’ असे अनेकविध विषय हाताळणारी नाटके सादर झाली.

‘तो येणाराय’ हे नाटक अंतिम फेरीतही विशेष लक्षवेधी ठरले. अभिजित कुलकर्णी आणि शिल्पा दांडेकर-पाठक यांना दोन्ही पातळ्यांवर अभिनयाची रौप्यपदके प्राप्त झाली. संगीत ‘ययाति देवयानी’ आणि संगीत ‘कट्यार काळजात घुसली’ याही नाटकांची निर्मिती ॲक्टिव्ह ग्रुपने केली. या नाटकांनी संगीत राज्य नाट्य स्पर्धेत लक्षणीय यश प्राप्त केले.

दरम्यानच्या काळात संस्थेने बालनाट्य चळवळीत काम केले. ‘सुतावरून स्वर्गाला’, ‘सुलूची गोष्ट’, ‘गोष्टीच्या गोष्टीची गोष्ट’, ‘एक हिरवी गोष्ट’ या बालनाट्यांची निर्मिती केली. यातील तीन बालनाट्ये कऱ्हाड, डोंबिवली आणि नांदेडच्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात सादर झाली. ‘एक हिरवी गोष्ट’ हे बालनाट्य मराठी बालकुमार साहित्य संमेलनात सादर झाले.

यानिमित्त ओंकार कुष्टे, अजिंक्य गोवंडे, अक्षय जरंडीकर, साक्षी जरंडीकर, संजना ओतारी, प्राजक्ता ओतारी, दिग्विजय लोकरे, किरण लोकरे, स्वाती वसगडेकर, अनघा कहाळेकर, सुकन्या जाधव, प्राजक्ता जोशी, वरद मुजुमदार, पराग कुलकर्णी, हंबीरराव पवार,

प्रणव हसबनीस आदी बालकलाकारांनी रंगभूमीवर प्रथमच प्रवेश केला. संस्थेने वेळोवेळी तरुण, होतकरू कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले. यात प्रामुख्याने अनुप बेलवलकर, सरिता मेहेंदळे, नीलेश निकम,

बीना जोशी, यशोधन गडकरी आणि इरफान मुजावर यांचा विशेष उल्लेख करावा लागेल. आज यातील अनेक मंडळी सांगलीची नाट्यक्षेत्रात सांस्कृतिक पताका फडकवत आहेत. ‘लव्ह’, ‘उजेड फुला’, ‘दरिया’, ‘ती सात वर्षं’ या एकांकिकांच्या माध्यमातून महाराष्ट्रात सर्वदूर ॲक्टिव्ह ग्रुप ही संस्था पोहोचली.

‘वृंदावन’ हे इरफान मुजावर लिखित आणि डॉ. दयानंद नाईक दिग्दर्शित नाटक प्राथमिक फेरीत, तसेच अंतिम फेरीत विशेष गाजले. या नाटकाला एकूण पंधरा पारितोषिके प्राप्त झाली. या नाटकातील कविता गडकरी, धनश्री गाडगीळ, श्रुती कुलकर्णी आणि यशोधन गडकरी यांच्या अभिनयाचे विशेष कौतुक झाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT