actor aamir khan tests positive for covid19 cm Uddhav Thackeray same programme
actor aamir khan tests positive for covid19 cm Uddhav Thackeray same programme  
मनोरंजन

आमिरला कोरोना, मुख्यमंत्र्यांवर क्वॉरनटाईनची वेळ; 'वर्षा' वर दोघेही होते एकाच कार्यक्रमात

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - बॉलीवूडचा प्रसिध्द अभिनेता आमीर खान याला कोरोना झाल्यानं त्याच्या चाहत्यांनी काळजी व्यक्त केली आहे. यावर आमीरनं क्वोरोनटाईन होण्यास प्राधान्य दिले आहे असे असले तरी एक वेगळीच शंका यानिमित्तानं उपस्थित झाली आहे ती म्हणजे आमीर ज्या कार्यक्रमात होता त्याच कार्यक्रमाला मुख्यमंत्री उध्दव ठाकरेही उपस्थित होते. त्यामुळे आता त्यांना कोरोना होणार का? अशी चर्चा सोशल मीडियावर रंगलेली दिसत आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री यांचे पुत्र आदित्य ठाकरे आणि पत्नी रश्मी ठाकरे यांनाही कोरोनाची लागण झाल्यानं त्यांनी क्वॉरनटाईन होण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र आता चक्क मुख्यमंत्र्यांनाच कोरोना यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यासगळ्या चर्चेला उधाण येण्याचं कारण म्हणजे आमिर खान दोन दिवसांपूर्वी झालेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत ‘वर्षा’ बंगल्यावरील  कार्यक्रमाला हजर होता.

आमिर सध्या घरीच क्वारंटाइनमध्ये राहत असून सर्व नियमांचं काटेकोरपणे पालन करत असल्याची माहिती त्याच्या प्रवक्त्यांनी दिली. त्याचप्रमाणे गेल्या काही दिवसांत आमिरच्या संपर्कात आलेल्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून कोरोनाची चाचणी करून घ्यावी, असंदेखील त्यांनी म्हटलंय. २२ मार्च रोजी जागतिक जल दिनाचं औचित्य साधून पाणी फाऊंडेशनच्या 'सत्यमेव जयते समृद्ध गाव' स्पर्धेच्या कार्यक्रमात आमिरने हजेरी लावली होती. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेसुद्धा कार्यक्रमाला उपस्थित होते. आमिर सध्या त्याच्या आगामी 'लालसिंह चड्ढा' या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. मात्र कोरोनाची लागण झाल्याने चित्रपटाचं शूटिंग थांबवण्यात आलं आहे. आमिर पूर्ण बरा झाल्यानंतर शूटिंगला पुन्हा सुरुवात होईल, अशी माहिती त्याच्याकडील प्रवक्त्यांनी दिली.

जागतिक जल दिनाचे औचित्य साधून पाणी फाऊंडेशनच्या सत्यमेव जयते समृद्ध गाव स्पर्धेचा गौरव सोहळा मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा निवासस्थानी झाला होता. हा कार्यक्रम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झाला होता.  कोव्हिडचा संसर्ग झपाट्याने वाढत असून रुग्णदुपटीचा कालावधी 100 दिवसांच्या आत आला आहे. अवघ्या सात दिवसांच्या काळात मुंबईतील कोव्हिड रुग्णदुपटीचा कालावधी 56 दिवसांनी घटला आहे.

मुंबईत मंगळवारी दिवसभरात ३५१२ नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे रुग्णांची संख्या  3 लाख 69 हजार 426 वर पोहोचली आहे. तर दिवसभरात आठ जणांचा मृत्यू झाला. मुंबईत 38 इमारती आणि झोपडपट्ट्या प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. तर सक्रिय सीलबंध इमारतींची संख्या 363 इतकी आहे. 

 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah: POK भारताचे आहे अन् आम्ही ते परत घेऊ; अमित शाह यांचा इशारा

Pune Loksabha: धंगेकर की मोहोळ? कँटोन्मेंटमधील 'हे' गणित ठरवणार कोणत्या उमेदवाराला मिळणार आघाडी

Panchayat 3 : वेळेआधीच पंचायत 3 चा ट्रेलर प्रदर्शित; पुन्हा एकदा रंगणार गावकरी आणि सचिवाची जुगलबंदी

Mahadev App: महादेव बेटिंग अ‍ॅपचे पुणे कनेक्शन, व्यापाऱ्यासह 70 जणांना अटक

IPL 2024 : 18 मे रोजी होणारा RCB Vs CSK सामना पावसामुळे रद्द झाला तर… प्लेऑफसाठी कोण ठरणार पात्र?

SCROLL FOR NEXT