actor ajinkya raut new serial Abol Pritichi Ajab Kahani on sony marathi sakal
मनोरंजन

Ajinkya Raut: 'विठु माऊली' आणि 'इंद्रा' नंतर अभिनेता अजिंक्य राऊतचं छोट्या पडद्यावर दमदार कमबॅक

अजिंक्य राऊत घेऊन आलाय, 'अबोल प्रीतीची अजब कहाणी'

नीलेश अडसूळ

Abol Pritichi Ajab Kahani : 'विठू माऊली' मालिकेतून घराघरात पोहोचलेला विठ्ठल आणि 'मन उडू उडू झालं' या मालिकेतून इंद्रा म्हणून लाखो तरुणींची क्रश झालेला अभिनेता अजिंक्य राऊत, सध्या बराच चर्चेत आहे. केवळ मालिकाच नाही तर, अजिंक्यने 'टकाटक २', 'सरी' असे दर्जेदार चित्रपट करून प्रेक्षकांना भुरळ घातली.

त्यामुळे अजिंक्य राऊतचं प्रचंड फॅन फॉलोइंग आहे. त्याच्या लुकचे, अभिनयाचे अनेक दिवाने आहे. त्यामुळे अजिंक्य राऊत मालिका विश्वात पुन्हा कधी झळकणार याचे सारेच वाट पाहत होते. अखेर तो क्षण आला आहे.

अजिंक्य आता सोनी मराठी वाहिनीवर झळकणार असून, 'अबोल प्रीतीची अजब कहाणी' या मालिकेत तो प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

(actor ajinkya raut new serial Abol Pritichi Ajab Kahani on sony marathi)

निरनिराळे विषय आणि रंजक मालिका घेऊन सोनी मराठी वाहिनी नेहमीच प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. तशीच एक नवी मालिका सोनी मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी घेऊन येते आहे. 'अबोल प्रीतीची अजब कहाणी' ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे.

त्याची पहिली झलक नुकतीच पाहायला मिळते आहे. प्रेक्षकांचा लाडका अजिंक्य राऊत या मालिकेतून टेलिव्हिजनवर कमबॅक करतो आहे. त्याच्याबरोबर गुणी अभिनेत्री जान्हवी तांबट हीसुद्धा या मालिकेतून विशिष्ट व्यक्तिरेखा साकारताना पाहायला मिळते आहे. तर आता ही 'अबोल प्रीतीची अजब कहाणी' लपूनछापून कशी फुलतेय हे नक्कीच पाहायला मिळेल.

अभिनेता अजिंक्य राऊत पुन्हा एकदा एका नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्याचे या आधीचे काम प्रेक्षकांना विशेष आवडले. त्याच्या नव्या भूमिकेची त्याचे चाहते मनापासून वाट पाहत होते. अजिंक्य पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर एका नव्या भूमिकेतून दिसणार आहे.

मालिकेचा फर्स्ट लूक प्रेक्षकांना विशेष आवडतो आहे कारण मालिकेची नायिका जान्हवी तांबट ही वेगळ्या रूपात दिसते आहे. ती चक्क एका बॉडीगार्डच्या वेशात आपल्याला दिसते आहे, तेही पुरुष बॉडीगार्डच्या वेशात. आता हा बॉडीगार्ड कशा प्रकारे प्रेक्षकांसमोर येईल, हे पाहणे उत्सुकतेचे असेल. ही मालिका १७ जुलैपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojna: परितक्त्या, एकल महिलांना ‘लाडकी बहीण’ योजनेतून डच्चू, ई-केवायसीसाठी उरले केवळ तीन दिवस, महिलांची धावपळ सुरू

Amazon Protest: आदिवासी समुदायाची निदर्शने; हवामान परिषदेच्या प्रवेशद्वाराबाहेर आंदोलन

Nashik BD Bhalekar School : बी. डी. भालेकर शाळेसाठी निधी मिळणार! शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या आश्वासनानंतर १६ दिवसांचे आंदोलन स्थगित

Nashik Municipal Election : नाशिक महापालिका निवडणुकीचा युती-आघाडीचा 'गुंता' कायम; राजकीय पक्षांच्या धोरणात मोठा फरक

S. Jaishankar: भारत अमेरिका संबंधांवर जयशंकरांची थेट नजर; न्यूयॉर्क परिषदेत सखोल आढावा

SCROLL FOR NEXT