Akshay Kumar
Akshay Kumar  Sakal
मनोरंजन

Akshay Kumar: बापरे प्रमोशसाठी काय पण! अक्षयनं 3 मिनिटांत 184 सेल्फी काढल्या थेट गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच मोडला

सकाळ डिजिटल टीम

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार गेल्या काही दिवसांपासून त्याच्या आगामी 'सेल्फी' चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट 24 फेब्रुवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे, ज्यासाठी कलाकार प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. दरम्यान, त्याने एक नवा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

अक्षय कुमार नुकताच चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने मुंबईत त्याच्या चाहत्यांमध्ये पोहोचला. यादरम्यान त्याचे चाहते मोठ्या संख्येने आले, ज्यांच्यासोबत अभिनेत्याने जबरदस्त सेल्फी घेतले आणि यादरम्यान त्याने एक विक्रम केला.

यादरम्यान अक्षय कुमारने 3 मिनिटांत चाहत्यांसोबत 184 सेल्फी काढले. यासह त्याने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मोडला. यापूर्वी 3 मिनिटांत सर्वाधिक सेल्फी घेण्याचा विक्रम अमेरिकेच्या जेम्स स्मिथच्या नावावर होता, त्याने 168 सेल्फी क्लिक केले होते. आता मात्र अक्षयने हा विक्रम मोडीत काढला आहे.

मात्र, सध्या अक्षय कुमार सेल्फी या चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. काही काळापूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता, जो लोकांना खूप आवडला होता. त्याचवेळी या चित्रपटाचे 'मैं खिलाडी तू अनारी' हे गाणे देखील रिलीज करण्यात आले आहे, जे खूप लोकप्रिय आहे.

या गाण्यावर लोक खूप धमाल करत आहेत. हे गाणे सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले असून लोक त्यावर रील व्हिडिओ बनवत आहेत.

सेल्फीमध्ये अक्षय कुमारसोबत इमरान हाश्मी आणि नुसरत भरुचासारखे स्टार्स दिसणार आहेत. हा चित्रपट एका सुपरस्टार आणि त्याच्या सुपरफॅनच्या कथेवर आधारित आहे. या चित्रपटात अक्षय कुमार एका मोठ्या सुपरस्टारच्या भूमिकेत दिसणार असून इमरान हाश्मी त्याच्या चाहत्याच्या भूमिकेत दिसणार आहे.

अक्षय कुमार आणि इमरान हाश्मी यांना समोरासमोर पाहण्यासाठी लोक खूप उत्सुक आहेत. आता हा चित्रपट लोकांना कितपत आवडतो हे पाहावे लागेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT