Akshay Kumar Visits Kedarnath: Esakal
मनोरंजन

Akshay Kumar Visits Kedarnath: 'एक तरी सिनेमा हिट होऊ दे रे बाबा'! अक्षय केदारनाथ बाबाच्या चरणी

Vaishali Patil

Akshay Kumar Visits Kedarnath: बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार हा त्याच्या अ‍ॅक्शन आणि कॉमेडीचा किंग आहे. अक्षय कुमार हा अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो.

गेले काही दिवस अक्षयसाठी काही खास राहिलेलं नाही. त्याचे बच्चन पांडे असो किंवा रक्षाबंधन नाहितर आत्ताच रिलिज झालेला सेल्फी. हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटले.

मात्र आता अक्षय वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. अक्षय मंगळवारी केदारनाथ मंदिराला भेट दिली. अक्षयचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत. या व्हिडिओत तो मंदिरात फिरत आहे आणि मंदिराबाहेर हात जोडून फिरतांना दिसत आहे.

एएनआयने अक्षय कुमारचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये अक्षय कुमारने कपाळावर टिका लावला आहे.

यात अक्षय कुमार काळ्या रंगाचा हाफ टी-शर्ट पँट मध्ये देवाचं दर्शन घेतल्यानंतर अक्षय कुमार मंदिरातून बाहेर येतो आणि दोन्ही हात जोडून चाहत्यांचे आभार मानले आहे.

त्याचे चाहते त्याच्याभोवती जमले असताना त्याने उर्वरित अनुयायांसह 'हर हर महादेव' चा जयघोष केला आहे.

त्यासोबतच केदारनाथ धामचे फोटो अक्षयनेही सोशल मीडियावर शेअर केले आहे. त्याने पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, "जय बाबा भोलेनाथ". व्हिडिओमध्ये, अभिनेता केदारनाथ धामच्या वादकांचा आनंद घेताना दिसत आहे. त्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अक्षय कुमार त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगसाठी डेहराडूनला पोहोचला होता आणि मंगळवारी हेलिपॅडवरून केदारनाथला पोहोचला. त्याने येथे बाबांचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर त्याला रुरकीमध्ये शूटिंग करायचे आहे.

अक्षयच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो या वर्षी, तो OMG 2 आणि Sourarai Pottru च्या हिंदी रिमेकमध्ये दिसणार आहे.

त्याच्याकडे टायगर श्रॉफसोबतचा 'बडे मियाँ छोटे मियाँ' हा चित्रपटही आहे जो 2024 मध्ये रिलीज होणार आहे. त्याचबरोबर तो 'हेरा फेरी'च्या तिसऱ्या भागातही दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Updates : विजय वडेट्टीवार आणि नाना पटोलेंनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट

Kantara Chapter 1: ‘कांतारा-चॅप्टर १’ मध्ये दिलजीत दोसांझची एंट्री

Tokyo World Athletics 2025: जागतिक ॲथलेटिक्समध्ये तेजस शिरसेची उपांत्य फेरी थोडक्यात हुकली

Kolhapur Bhakt Niwas Scam : भक्त निवास म्हणून दाखवल्या शाळेच्या खोल्या, निधीचा गैरवापर; माहितीच्या अधिकारात धक्कादायक माहिती, मुख्य सूत्रधार कोण?

करदात्यांसाठी गूडन्यूज! ITR दाखल करण्यासाठी १ दिवस मुदतवाढ, मध्यरात्री निर्णय; आजच भरा

SCROLL FOR NEXT