actor amir khan birthday special juhi chawla refused to kiss- him in qayamat se qayamat tak 
मनोरंजन

किसिंग सीनला पहिल्यांदा नाही, नंतर हो म्हणाली; किस्सा 'कयामत से कयामत तक'चा

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - बॉलीवूडमध्ये असे काही कलावंत आहेत की ज्यांच्याविषयी चाहत्यांना कमालीची उत्सुकता आहे. मिस्टर परफ्केशनिस्ट म्हणून आमीर खानचे नाव घ्यावे लागेल. सध्या आमीर खानच्या नव्या चित्रपटाची चर्चा आहे. सोशल मीडियावर आमीरचा बोलबाला आहे. तो नेहमी वेगवेगळ्या विषयांवर विचार आपल्या चाहत्यांशी शेअप करत असतो. त्याचा एक किस्सा सध्या कमालीचा लोकप्रिय होताना दिसत आहे. त्यात त्याची सहकलाकार जुही चावलाही आहे. त्या दोघांची जोडी एकेकाळी फार लोकप्रिय झाली होती. चाहत्यांची मोठ्या प्रमाणात त्या दोघांना पसंती मिळाली होती. आमीरनं त्याच्या आतापर्यतच्या चित्रपटप्रवासात एकापेक्षा एक सरस चित्रपट दिले आहेत. त्याचा लाल सिंग चढ्ढा चित्रपटाची उत्सुकता चाहत्यांना आहे.

आमीरनं त्याच्या अनेक चित्रपटांमध्ये किसिंग सीन दिले आहेत. त्यात एक चित्रपट असा आहे की ज्यात एका अभिनेत्रीनं आमीरला किस करण्यास नकार दिला होता. मात्र नंतर असे काही झाले की ती अभिनेत्री त्याला किस करायला तयार झाली होती. आमीरचा सुरुवातीचा काळ संघर्षाचा होता. त्यावेळी कित्येक अभिनेत्रींना त्याच्याबरोबर काम करण्याची इच्छा होती. त्यापैकी एक अभिनेत्री म्हणजे जुही चावला. एका चित्रपटात आमीरचा आणि जुहीचा किसिंग सीन होता. मात्र त्यावेळी जुहीनं तो सीन द्यायला नकार दिला होता.

वास्तविक जुही आणि आमीरच्या जोडीची त्यावेळी मोठी लोकप्रियता  होती. आमीरनं होली या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये एंट्री केली होती. मात्र त्याला कयामत से कयामत तक मधून त्याला प्रसिध्दी मिळाली होती. त्याच चित्रपटातून जुही चावलाही एक वेगळ्या प्रकारची ओळख मिळाली होती. त्यावेळी तिची लोकप्रियता वाढली. जुहीचा पहिला चित्रपट होता सल्तनत. कयामत से कयामत तक मध्ये अकेले है तो क्या गम है नावाचे एक गाणे होते. त्यावेळी आमीरला जुहीला किस करायचे होते.

जुहीला जेव्हा त्या किसिंग सीनविषयी सांगण्यात आले तेव्हा तिनं नकार दिला होता. जुहीच्या नकारानंतर दिग्दर्शक मन्सुर खान यांनी रागाच्या भरात चित्रिकरण थांबवले होते. प्रत्येकानं आपली कामं थांबवून बसून घ्यावे अशी विनंती त्यांनी सर्व क्रु ला केली होती. दहा मिनिटांनंतर जुही त्या सीनला तयार झाली होती. त्या सीनच्या वेळी ती मानसिकदृट्या तयार नसल्याचे तिनं सांगितले. 
 
 

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Railway : नवरात्रोत्सवापासून ते दिवाळीपर्यंत... 'या' राज्यात धावणार विशेष गाड्या; 6,000 गाड्यांचं नियोजन, पाहा रेल्वेचं वेळापत्रक

Women Health: पाळी, गरोदरपणा आणि रजोनिवृत्तीचा स्त्रियांच्या आतड्यांवर परिणाम; वाचा डॉ. राकेश पटेल यांचे सविस्तर मार्गदर्शन

Gemini AI Photo Trend: जगातील नेत्यांसोबत हायपर-रिअ‍ॅलिस्टिक फोटो तयार करा! जाणून घ्या सोप्या स्टेप्स...

Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण' योजना बंद होणार नाही: मंत्री गिरीश महाजन यांची ग्वाही

SIP Top 5 Mistakes: SIP मध्ये गुंतवणूक करताय? या 5 चुका टाळा, नाहीतर रिटर्न्स मिळण्याऐवजी नुकसान होऊ शकतं

SCROLL FOR NEXT