actor and director tariq shah passed away husband of actress shoma anand 
मनोरंजन

प्रसिध्द अभिनेता आणि निर्माता तारिक शाह यांचे निधन 

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - बॉलीवूडमधील प्रसिध्द अभिनेता आणि निर्माता - दिग्दर्शक तारिक शहा यांच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी आहे. ती म्हणजे त्यांचे निधन झाले आहे. शनिवारी रात्री उशिरा त्यांनी एका हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला. तारिक शाह हे प्रख्यात अभिनेत्री शोमा आनंद यांचे पती होते. तारिक शहा यांच्या जाण्यानं बॉलीवूडवर शोककळा पसरली आहे. सध्या बॉ़लीवूडला कोरोनानं ग्रासलं आहे. यापूर्वी अनेक सेलिब्रेटींना कोरोनाची लागण झाली आहे. ते क्वॉरंटाईन झाले आहेत. दिवसेंदिवस कोरोना वाढत चालला आहे. आपल्यामुळे कुणाला कोरोना होऊ नये यासाठी सर्वांनी काळजी घ्यावी असे आवाहनही कोरोनाग्रस्त कलाकारांनी केली आहे.

शोमा आनंद यांनी कुली, घर व्दार, बडे घर की बेटी आणि हंगामा सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. तारिक शहा यांच्या निधनाची बातमी फोटोग्राफर विरल भिय़ानीनं सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्यानं शनिवारी व्टिटरवर लिहिलं आहे की, अतिशय वाईट बातमी आहे. ती म्हणजे जन्मकुंडलीचे अभिनेता आणि दिग्दर्शक तारिक शहा यांचे निधन झाले आहे. सध्या बॉलीवू़डमधील परिस्थिती गंभीर आहे. अनेक प्रसिध्द कलाकारांना कोरोना झाला आहे. त्यामुळे कित्येक चित्रपटांचे चित्रिकरण थांबवण्यात आले आहे. सोशल मीडियावरुनही तारिक यांना श्रध्दांजली वाहण्यात आली आहे.

इंडिया टुडेनं दिलेल्या माहितीनुसार तारिक शाह गेल्या काही काळापासून न्युमोनियानं त्रस्त झाले होते. त्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तारिक शहा यांनी बहार आने तक, महात्मा आणि मुंबई सेंट्रल सारख्या चित्रपटांमध्ये काम केले होते. त्यांच्या अभिनयाला मोठ्या प्रमाणात चाहत्यांचा प्रतिसाद मिळाला होता. केवळ अभिनयच नाही तर तारिक यांनी दिग्दर्शनाच्या क्षेत्रातही चमकदार कामगिरी केली होती. त्यांनी जन्म कुंडली नावाच्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. त्यात विनोद खन्ना, जितेंद्र, रिना रॉय आणि अनुपम खेर सारखे कलावंत होते. 1995 मध्ये तो चित्रपट प्रदर्शित झाला होता. इतकचं नाही तर तारिक शहा यांनी कडवा सच नावाच्या मालिकेचे दिग्दर्शन केले होते. त्यालाही चाहत्यांचा प्रतिसाद मिळाला होता. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : बुलडाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाडांवर अद्याप कारवाई नाहीच; वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची माहिती

Drowning Accident: पोहायला गेलेल्या दोन मुलांचा मृत्यू; लाव्हा येथील घटनेने समाजमन सुन्न

Monsoon Rain : राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढणार, विदर्भात अतिवृष्टीचा इशारा, पुढील 3 दिवस कसे असेल हवामान?

Student Survey: 'सातारा जिल्ह्यात शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण'; गळती शून्यावर आणण्याचा शिक्षण विभागाचा प्रयत्न

Amravati Crime: महिलेची गळा आवळून हत्या; कपड्याने हातपाय होते बांधलेले

SCROLL FOR NEXT