actor aroh welankar tweet for pm narendra modi for completed 9 years of government sakal
मनोरंजन

Aroh Welankar: तुमच्यासारखे पंतप्रधान.. अभिनेता आरोह वेलणकरचं मोदींसाठी खास ट्विट

मोदी सरकारला ९ वर्ष पूर्ण होताच अभिनेत्याचे ट्विट

नीलेश अडसूळ

Aroh velankar : अभिनेता आरोह वेलणकर हा अभिनयासोबतच सामाजिक कामातही बराच सक्रिय असतो. शिवाय राजकीय विश्वावरही तो भाष्य करताना दिसतो. त्याच्या सोशल मीडिया अकाऊंट वर तो बराच सक्रिय असतो.

त्याचा पाठिंबा उघडपणे भाजप पक्षाला असल्याचे वारंवार दिसले आहे. तो केंद्र सरकारच्या पाठिंब्यासह महाविकास आघाडीवर अनेकदा टीका करत असतो. तो त्याच्या ट्विटर अकाउंट वरून आपले विचार मांडत असतो.

नुकतेच त्याने एक ट्विट केले आहे, ज्यामध्ये त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्या बद्दल त्याने एक महत्वाचं विधान केलं आहे.

(actor aroh welankar tweet for pm narendra modi for completed 9 years of government)

२०१४ मध्ये मोदी सरकार आलं आणि केंद्रामध्ये भाजपने सत्ता स्थापन केली. त्यानंतर २०१९च्या निवडणुकीतही त्यांना बहुमत मिळालं. सलग नऊ वर्षे भारतात मोदी सरकारचे अस्तित्व आहे. मंगळवारी ३० मे रोजी मोदी सरकारला ९ वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक ट्वीट केलं.

त्या असं लिहिलं होतं की, ''आज आम्हाला नऊ वर्ष पूर्ण झाली. या काळात आम्ही देशाची सेवा केली. आम्ही प्रत्येक निर्णय, कृती ही देशातील नागरिकांचे आयुष्य सुधारण्याच्या दृष्टीने घेतलेला होता आणि इथून पुढेही देशाला विकसित बनवण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू राहतील.'

यावर अभिनेता (Aroh velankar) आरोह वेलणकर यानेही मोदींचे ट्विट  रिट्वीट करत लिहिले आहे की, 'तुमच्या सारखे पंतप्रधान या देशाला लाभले, हे आमचे भाग्य..'. त्याच्या या ट्विटची सध्या बरीच चर्चा आहे.

मध्यंतरी त्याने 'महाविकास आघाडीचे दिवस संपत आलेत' असेही ट्विट केले होते. त्यामुळे अशा वादग्रस्त विधानांमुळे तो सतत चर्चेत असतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Railway Mega Block : मुंबईप्रमाणे पुण्यातही मेगाब्लॉक! अमरावती-पुणेसह जवळपास ११ गाड्या रद्द, तर 'या' गाड्यांचे मार्ग बदलले

Maharashtra Weather Update : हिवाळ्याचा मूड बदलतोय! राज्यात किमान तापमानात चढ-उतार, ढगाळ वातावरण; गारठा कमी होणार

Latest Marathi News Live Update : महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज बीड-सोलापूर दौऱ्यावर

Kolhapur Crime News : ‘तुला बाळ होत नाही’ पती, सासू, दीर, जाऊ सगळ्यांनी छळलं; शेवटी विवाहितेनं जे केलं ते धक्कादायक, कोल्हापुरातील घटना

अग्रलेख - जो दुसऱ्यावरी विसंबला...

SCROLL FOR NEXT