arshad warsi
arshad warsi 
मनोरंजन

अव्वाच्या सव्वा वीज बिल भरण्यासाठी अर्शद वारसीने निवडला 'हा' मार्ग...  

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन झाले. त्या लॉकडाऊनचे अनेक परिणाम समोर आले येत आहेत. त्यापैकी एक म्हणजे अनेकांना आलेली अव्वाच्या सव्वा वीज बिले. अनेक सेलिब्रिटीनाही मोठमोठी रकमेची वीज बिले आली आहेत. त्यांनी वीज बिलांचा संदर्भ देत अदानी वीज पुरवठा कंपनीवर चांगलेच तोंडसुख घेतले आहे. अभिनेता अर्शद वारसीला एक लाख तीन हजार 564 रुपयांचे वीज बिल आले होते. ते बिल पाहून तो प्रचंड संतापला होता. त्यानंतर त्याने अदानी इलेक्ट्रिसिटीवर टीका केली.

मुंबईतील नागरी समस्येवर व्यक्त होणारी पत्रचळवळ अखेर थांबली...

या  महिन्यात जास्त बिल आल्यामुळं तुमची चिंता आम्ही समजू शकतो, आम्ही तुम्हाला मदतही करण्यास तयार आहोत. मात्र, वैयक्तिक बदनामी करणारी टीका सहन केली जाणार नाही', अशा शब्दांत अदानी इलेक्ट्रिसिटीकडून अर्शदला प्रत्युत्तर देण्यात आलं होतं. त्यानंतर अदानी इलेक्ट्रिसिटीकडून अर्शदची समस्या सोडवण्यात आली. त्यामुळं त्यानं हे ट्विटस् डिलिट केले आहेत. 

मात्र आता पुन्हा अर्शदने ट्विट केले आहे. त्यामध्ये त्याने म्हटले आहे की, पाच जुलै रोजी खात्यातून एक लाख तीन हजार 564 रुपये डेबिट करण्यात आले आहे. मला वीज बिल देण्यासाठी माझ्या ज्या पेंटिंग्ज आहेत, त्या माझ्या चाहत्यांनी खरेदी कराव्यात, अशी विनंती केली आहे. पुढील वीज बिल भरण्यासाठी मी माझी किडनीही तयार ठेवली असल्याचे अर्शदने ट्विटमध्ये म्हटले आहे.

अर्शदच्या या ट्विटवर एका चाहत्याने मजेशीर उत्तर दिले आहे की, अर्शदजी, तुमच्या पेंटींग्ज विकत घ्यायचे म्हणजे मलाच माझी किडनी विकावी लागेल. तर अभिनेत्री टिस्का चोप्राने म्हटले आहे की, तू माझ्यासाठी एक पेंटींग्ज नक्की बाजूला ठेव, मी घेईन. तर अभिनेत्री श्रुती सेठने अर्शदला दिलेल्या उत्तरात म्हटले आहे की, मी तुझ्या दोन चित्रांची मालकीण बनली आहे. मला त्याचा अभिमान आहे. अर्शदच्या या वीज बिलाबाबत अनेक प्रतिक्रिया उमटल्या आहेत. याअगोदरही अनेक सेलिब्रिटीना वाढीव वीज बिले आल्याचे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT