actor atul kale play role of yashwantrao chavan in Maharashtra Shahir movie sakal
मनोरंजन

Maharashtra Shahir: 'महाराष्ट्र शाहीर' चित्रपटात 'हा' अभिनेता साकारणार 'यशवंतराव चव्हाण'

केदार शिंदे दिग्दर्शित 'महाराष्ट्र शाहीर' चित्रपटाचे नवे पोस्टर एकदा बघाच..

नीलेश अडसूळ

kedar shinde post: केदार शिंदे दिग्दर्शित 'महाराष्ट्र शाहीर' (Maharashtra Shahir) या सिनेमाची सध्या जोरदार चर्चा आहे. केदार शिंदे दर काही दिवसांनी या चित्रपटाविषयी लिहीत असतात, आठवणी शेयर करत असतात. एप्रिल 2023,मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार असून या चित्रपटा संदर्भात आता अनेक नवीन घोषणा होत आहे. आज महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा स्मृतिदिन, त्या निमित्ताने 'महाराष्ट्र शाहीर' या चित्रपटात यशवंतराव चव्हाण यांची भूमिका कोण साकारणार ही उघड झाले आहे. नुकताच एक पोस्टर केदार शिंदे यांनी शेयर केला आहे.

(actor atul kale play role of yashwantrao chavan in Maharashtra Shahir movie)

शाहीर कृष्णराव गणपतराव साबळे (shahir sable) म्हणजेच महाराष्ट्राचे लाडके शाहीर साबळे. शाहीर साबळे यांच्या गाण्यांवर महाराष्ट्रानेच नाही तर जगाने प्रेम केलं. त्यांचं महाराष्ट्र गीत असो, खंडोबाचा जागर किंवा कोळी गीत.. प्रत्येकच गाणं हे माणसाच्या काळजात हात घालणारं. शाहीर साबळे यांनी महाराष्ट्राला दिलेली 'महाराष्ट्राची लोकधारा' आजही अनेकांच्या स्मरणात आहे. शाहीर साबळे यांच्या पश्चात हा वारसा त्यांचा नातू म्हणजेच दिग्दर्शक केदार शिंदे (kedar shinde) पुढे नेत आहेत. लवकरच ते शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित 'महाराष्ट्र शाहीर' हा चित्रपट घेऊन येत आहेत. २८ एप्रिल २०२३ रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे. या चित्रपटातील एका महत्वाच्या भूमिकेविषयी आज केदार शिंदे यांनी पोस्ट केली आहे. 

नुकतच या सिनेमाचं नवं पोस्टर आऊट झालं आहे. या सिनेमात महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण (Yashwantrao Chauhan) यांच्या भूमिकेत अतुल काळे (Atul kale) दिसणार आहेत. आज यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनानिमित्त हे खास पोस्टर शेअर करण्यात आलं आहे.

हेही वाचा: मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

पोस्टर शेअर करत केदार शिंदेंनी लिहिलं आहे की, 'संयुक्त महाराष्ट्राची चळवळ पार पडल्यावर महाराष्ट्राचा मंगल कलश घेऊन आले असे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण.. 'जय जय महाराष्ट्र माझा' हे महाराष्ट्र गीत ज्यांच्या समोर पहिल्यांदा सादर झालं असं धोरणी व्यक्तिमत्त्व यशवंतराव चव्हाण.. हे सारं असूनही शाहीर साबळे आणि यशवंतराव ह्यांचं नातं राजकारणाच्या ही पलीकडचं होतं.. हेच नातं उलगडणार २८ एप्रिल २०२३ रोजी महाराष्ट्र शाहीर ह्या सिनेमात..'

अतुल काळे हे मराठीतील दिग्गज अभिनेते आहेत. 'वास्तव','जिस देश मै गंगा रहता है','दे धक्का' अशा अनेक सिनेमांत त्यांनी काम केलं आहे. तसेच अतुल काळे यांनी 'बाळकडू' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरादेखील सांभाळली आहे. 'माझा होशील ना' या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. आता ते 'यशवंतराव चव्हाण' यांची भूमिका साकारणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: उद्धव ठाकरे आणि शिवसेनेपासून राज ठाकरे दूर का होत गेले? वाद ते मनोमिलन timeline

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलच्या ३००+ धावा! मोडला विराट कोहलीचा ११ वर्षांपूर्वीचा विक्रम, रिषभ पंतचीही फिफ्टी

Sushil Kedia: माज उतरला, पण गुर्मी कायम; माफीनंतरही नवं ट्विट करत सुशील केडिया पुन्हा बरळले, शहांची स्तुती तर ठाकरेंना...

Divyang Students Demand : दिव्यांग विद्यार्थ्यांची होतेय कुचंबना! ३० जुलैपर्यंत वसतिगृहाचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा...; विद्यार्थ्यांचा सरकारला इशारा

Raigad News: अलिबाग मार्गावरील कोंडी सुटणार, प्रवाशांचा आरामदायी प्रवास होणार; सरकारचा प्लॅन सत्यात उतरणार

SCROLL FOR NEXT