actor bharat jadhav shared post on drama theatre
actor bharat jadhav shared post on drama theatre sakal
मनोरंजन

नाटक मध्येच थांबवून भरत जाधवने थेट महापौरांना फोन लावला.. त्यानंतर जे घडलं..

नीलेश अडसूळ

bharat jadhav : ओटीटीची जादू कितीही झाली तरी मराठी नाटकाचा करिष्मा कायम आहे. आजही लोक आवर्जून नाट्यगृहात नाटक पाहायला जातात. पण बऱ्याचदा नाट्यगृहात सुख सुविधांची कमतरता भासली की प्रेक्षक तक्रार करतात, कलाकारांवर चिडतात. अशा घटना अनेकदा झालेल्या आहेत. अगदी काही दिवसांपूर्वी मुंबईच्या रवींद्र नाट्य मंदिर येथे एसी बंद असल्यामुळे एका नाटकाचा प्रयोग थांबवला गेला. असाच एक किस्सा भरत जाधव सोबतही घडला आहे. पालिकेच्या एका चुकीमुळे त्याने अक्षरशः महापौरांनाही धारेवर धरल होतं. (actor bharat jadhav shared post on drama theatre)

भरत जाधवने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये भरतने एका चाहत्याच्या ट्वीट्सचे स्क्रीनशॉट्स शेअर केले आहेत. त्यात चाहत्याने लिहिले आहे की, 'स्वानुभव.. भरत जाधव यांच्या 'सही रे सही' च्या प्रयोगाला गेलो असताना, हॉलमधले काही पंखे बंद होते. त्यात एसी पूर्णपणे ठप्प होता. आम्ही प्रेक्षक बोंब मारायला लागलो. त्यावेळी नाटक मध्येच थांबवून भरत जाधवांनी महापौरांना फोन केला. आणि जोपर्यंत पंखे नीट करणार नाही, प्रयोग असाच थांबून राहील असं सांगितलं. अक्षरशः नाटक दीड तास थांबलं होतं. त्या दीड तासात भरत जाधव आमच्यासोबत बोलत होते. ते म्हणाले, तुम्ही प्रेक्षक अंधारात बसला आहात. इथे स्टेजवर आमच्या चेहऱ्यावर हजार-हजार वॅटचे लाईट आहेत. आम्हीसुद्धा घामाने बेजार झालो आहोत. तेव्हा स्टेजवर असणाऱ्यांची खरी दुरावस्था कळाली,' असे त्याने लिहिले आहे.

bharat jadhav post on drama theatre

हे ट्वीट शेअर करताना भरत जाधव म्हणाला, 'नाट्यगृह व्यवस्थपन हा एक पीएचडीचा स्वतंत्र विषय होऊ शकतो.' नाटक, मालिका आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमात अभिनेता भरत जाधवने आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. भरत जाधव सोशल मीडियावर सक्रीय असतो. त्याच्या 'सहा रे सही; या नाटकांचे ५ हजारांहून आधी प्रयोग झाले आहेत. हे नाटक अजूनही सुरु असून प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CAA Beneficiary: आधी सीएएची प्रमाणपत्रं वाटली आता तेच लाभार्थी थेट मोदींसोबत स्टेजवर!

IPL 2024 RCB vs CSK Live Score: विराटच्या सुरुवातीच्या तुफानानंतर बेंगळुरूत पावसाचं आगमन, सामना थांबला

Virat Kohli RCB vs CSK : मी एप्रिलमध्येच बॅग पॅक केली होती.... विराटला स्वतःच्या संघावर विश्वास नव्हता?

मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, सहा महिन्यात POK भारताचा भाग होईल; योगींची मोठी घोषणा

Latest Marathi News Live Update : पुणे-मुंबई हायवेवर वाहतूक कोंडी, वाहतूक संथ गतीने

SCROLL FOR NEXT