Actor Bharat Jadhavs upcoming film named Stepney 
मनोरंजन

भरत जाधव आणि 'स्टेपनी'...

सकाळवृत्तसेवा

मराठी चित्रपटसृष्टीतला विनोदाचा बादशहा आता प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे आणि तोही एक नवा कोरा विनोदी सिनेमा घेऊन. 'स्टेपनी' असे या चित्रपटाचे नाव आहे. भरत जाधव या चित्रपटातही विनोदी भूमिका निभावताना दिसणार आहे.   

भरत जाधव यांनी यापूर्वीही अनेक चित्रपट, मालिका आणि नाटकांमधून  विनोदी भूमिका साकारत प्रेक्षकांना पोट धरून हसवले आहे. आता 'स्टेपनी' या चित्रपटातून भरत जाधव पुन्हा एकदा चित्रपटगृहांमध्ये हशा पिकवण्यासाठी सज्ज झाले आहेत. बऱ्याच दिवसांनी भरत जाधव चित्रपटातून दिसणार आहेत.

या चित्रपटची निर्मिती श्री गणराया फिल्म्स आणि अनंत भुवड, नरेंद्र जयस्वाल, भटूलाल जयस्वाल यांनी केली आहे. तर चित्रपटाचे दिग्दर्शन अजीज नासीर यांनी केले असून छायांकन मुरली कृष्णा यांनी केले आहे. यासोबतच रोहित नागभिडे यांनी या सिनेमाला संगीत दिले असून राजेश एस. एस. यांनी पार्श्वसंगीत दिले आहे. संतोष नाकट यांनी संवादाची तर देवदास भंडारे यांनी कला आणि उदय इनामती यांनी ध्वनीची धुरा सांभाळली आहे. या चित्रपटाचे संकलन शशांक शाह यांनी केले असून हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हॅपी बर्थडे भाईजान! सलमान खानने गाठली साठी, पनवेलच्या फार्महाऊसवर जंगी पार्टी, एक्स गर्लफ्रेंडने केलं असं काही की...

BJP Sankalpnama Abhiyan : भाजपला हवा 'ग्राउंड लेव्हल फीडबॅक’, ‘संकल्पनामा अभियाना’मागची रणनीती काय?

Earbuds Tips: इअरबड्स हरवलेत? घाबरू नका! फक्त 1 मिनिटांत सापडतील, ‘ही’ सोपी ट्रिक वापरा

SA20: रोहित शर्माच्या 'भीडू' चे खणखणीत शतक; १६ चेंडूंत ८६ धावांचं वादळ, तरीही मुंबई इंडियन्सच्या संघाची थोडक्यात हार

खोपोलीत शिंदेसेनेच्या नेत्याची निर्घृण हत्या; तलवार-विळ्यासह कुऱ्हाडीने सपासप वार, अजितदादांच्या 10 पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा

SCROLL FOR NEXT