Dilip Tahil, Dhruv Tahil 
मनोरंजन

ड्रग्ज प्रकरणी मुलाच्या अटकेनंतर दिलीप ताहिल यांची प्रतिक्रिया, म्हणाले..

अँटी नार्कोटिक्स सेलने ध्रुव ताहिलला बुधवारी अटक केली.

स्वाती वेमूल

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते दिलीप ताहिल Dilip Tahil यांचा मुलगा ध्रुव ताहिल Dhruv Tahil याला बुधवारी अँटी नार्कोटिक्स सेलने (ANC) अटक केली. ड्रग्ज प्रकरणी Drugs Case एका चौकशीदरम्यान ध्रुवचं नाव समोर आलं आणि त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून अंमलपदार्थविरोधी पथक (NCB) बॉलिवूडमधील ड्रग्ज रॅकेटवर डोळा ठेवून आहे. यात अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींची नावं आतापर्यंत समोर आली. मुलाच्या अटकेनंतर दिलीप ताहिल यांनी पहिली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. "याप्रकरणी मला सध्या काहीच बोलायचे नाहीये", असं ते म्हणाले. (actor Dalip Tahil reacts to arrest of his son Dhruv in a drug case)

अँटी नार्कोटिक्स सेलचे आयुक्त दत्ता नलावडे यांच्या नेतृत्वाखाली ध्रुवच्या अटकेची कारवाई झाली. ध्रुववर ड्रग्जची खरेदी आणि विक्री करण्याचे आरोप आहेत. याआधी अटक करण्यात आलेल्या मुजम्मिल अब्दुल रहमान शेख या ड्रग्ज तस्कराच्या चौकशीदरम्यान ध्रुवचं नाव समोर आलं. मुजम्मिल आणि ध्रुव यांच्यात झालेल्या ड्रग्जचं चॅट पोलिसांसमोर आलं आहे.

हेही वाचा : गोव्यात 'सूर नवा ध्यास नवा'चं शूटिंग पाडलं बंद; सेटवर आमदारांचा गोंधळ

ध्रुव हा २०१९ पासून मार्च २०२१ पर्यंत आरोपी मुजम्मिलच्या संपर्कात असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ध्रुवच्या व्हॉट्स अॅप चॅटवरून आरोपीशी ड्रग्जसंदर्भात चर्चा झाल्याचं कळतंय. तसंच ध्रुव ताहिलवर मुजम्मिलच्या खात्यात सहा वेळा पैसे ट्रान्सफर केल्याचाही आरोप आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

दिलीप ताहिल यांनी बॉलिवूडमधील ४० वर्षांच्या करिअरमध्ये अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. 'बाजीगर', 'कहो ना प्यार है', 'भाग मिल्खा भाग', 'मिशन मंगल', 'कयामत से कयामत तक' यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

चंद्रशेखर बावनकुळेंची भाजपने राष्ट्रीय पातळीवर केली नियुक्ती, सोपवण्यात आली महत्त्वाची जबाबदारी

Fifa World Cup विजेत्या देशाचा क्रिकेटच्या मैदानावरील ऑस्ट्रेलियाच्या महासत्तेला धक्का; स्पेनचा २१-० हा विक्रम नेमका आहे तरी काय?

Manoj Jarange: सरकार मराठा समाजापेक्षा मोठं नाही; 29 ऑगस्टच्या आंदोलनाबाबत जरांगेंचा थेट इशारा, अंतरवालीत येण्याचे आवाहन

Marathi News Live Updates : वाराणसी विमानतळावर विमानातील प्रवाशाकडे आढळले शस्त्र

घरी नणंदेसोबत कशी वागते करीना कपूर? सैफ अली खानच्या बहिणीने सांगितली आतली गोष्ट; म्हणाली- ती नाटकी...

SCROLL FOR NEXT