actor digambar naik and actress sonali patil new marathi play natak drama bai wadyatun ja  sakal
मनोरंजन

Digambar Naik: अभिनेता दिगंबर नाईकला बाईनं केलंय हैराण.. म्हणतोय.. बाई वाड्यातून जा..

अभिनेता दिगंबर नाईक आणि बिग बॉस फेम सोनाली पाटील रंगभूमीवर करणार धिंगाणा..

नीलेश अडसूळ

digambar naik and pallavi patil: आपल्या विनोदी टायमिंगने रसिकांना खळखळून हसायला लावणारे अभिनेते दिगंबर नाईक सध्या एका बाईमुळे त्रस्त झाले आहेत. या बाईने त्यांना हैराण करून सोडलं आहे. म्हणून बाई वाड्यातून जा असं ते म्हणतायेत.

ही बाई नेमकी कोण? ती वाड्यात का आली आहे? ती बाई वाड्यात राहणार ? की दिगंबर नाईक तिला घालवण्यात यशस्वी होणार का ? हे पाहायचं असेल तर अभिनेते दिगंबर नाईक आणि बिगबॉस फेम सोनाली पाटील यांचे आगमी ‘बाई वाड्यातून जा’ हे धमाल विनोदी नाटक पाहावं लागेल.

(actor digambar naik and actress sonali patil new marathi play natak drama bai wadyatun ja )

येत्या बुधवारी २९ मार्चला अत्रे रंगमंदिर कल्याण येथे या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग रंगणार आहे. दिशा आणि कलारंजन प्रस्तुत या नाटकाचे निर्माते उदय साटम, प्रिया पाटील, आबा ढोले यांचे आहे. नाटकाचे लेखन दिग्दर्शन संकेत तांडेल यांचे आहे. (Latest Marathi News)

या नाटकाची कथा एका जुन्या वाड्या भोवती फिरते. हा वाडा विकायचा असतो. तो विकताना एका बाईमुळे कसा गोंधळ उडतो? याची धमाल कथा ‘बाई वाड्यातून जा’ या नाटकातून पाहायला मिळणार आहे.

अभिनेते दिगंबर नाईक आणि बिगबॉस फेम सोनाली पाटील या दोघांसमवेत या नाटकात भूषण घाडी, दीपा माळकर, भावेश टिटवळकर, अश्वजीत सावंतफुले आदि कलाकारांच्या भूमिका आहेत.(Marathi Tajya Batmya)

तब्बल चार वर्षांनी ‘बाई वाड्यातून जा’ या नाटकातून आपल्याला हसवायला सज्ज झालेले दिगंबर नाईक सांगतात, पुष्पगुच्छ जसा निरनिराळ्या फुलांनी समजलेला असतो तसंच हे नाटक सजलयं. धमाल मनोरंजन करणारं हे नाटक रसिकांना नक्की आवडेल असा विश्वास अभिनेते दिगंबर नाईक व्यक्त करतात.

तीन वेगळ्या जॉनरची गाणी या नाटकात असून गायक अश्मिक पाटील ,कविता राम यांचा स्वराज गाण्यांना लाभला आहे. संगीत सुशील कांबळे यांचे आहे.नाटकाची जाहिरात संकल्पना संजय खापरे यांनी सांभाळली आहे.

नेपथ्य वैभव पिसाट तर प्रकाशयोजना सौरभ शेठ यांची आहे. नेपथ्य निर्माण महेश धालवलकर यांचे आहे. रंगमंच व्यवस्था सचिन सावंत तर व्यवस्थापन जयेश निकम ह्यांचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक न लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6: ९० दिवस, १७ स्पर्धक; पाहा 'बिग बॉस मराठी ६' च्या घरातील स्पर्धकांची यादी

अजित पवारांना लाथ मारून हाकला किंवा माफी मागा, गाडीभर पुरावे कोर्टात द्या; भ्रष्टाचारावरून ठाकरे बंधूंनी फडणवीसांना घेरलं

Pune Cyber Crime : लग्नाचे आमिष दाखवून पुण्यात ४३ वर्षीय महिलेला २६ लाखांचा गंडा; येरवड्यात गुन्हा दाखल!

Raj Thackeray: पैसे फेकले की जनता विकत मिळते? ठाकरे बंधूंचा सरकारला थेट सवाल, राज ठाकरे म्हणाले- निवडणूक जिंकण्यासाठी...

SCROLL FOR NEXT