actor director Parag Bedekar Passes Away at age of 48 sakal
मनोरंजन

Parag Bedekar Passes Away: अभिनेता दिग्दर्शक पराग बेडेकर यांचे निधन..

गेली अनेक वर्षे मराठी रंगभूमीवर सक्रिय, 48 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास..

नीलेश अडसूळ

मराठी रंगभूमी, नाटक आणि मालिका अशा विविध माध्यमातून आपल्या अभिनयाची छाप पडणारे अभिनेते दिग्दर्शक पराग बेडेकर यांचे निधन झाले आहे. वयाच्या 48 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. झोपेत असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने रंगभूमीवर मोठी शोककळा पसरली आहे.

(actor director Parag Bedekar Passes Away at age of 48)

पराग शेवटचा श्वासापर्यंत रंगभूमीवर सक्रिय होते. अनेक नाट्य स्पर्धा, कार्यशाळा या माध्यमातून त्या युवा रंगकर्मींशीही जोडलेले होते. त्यांनी स्वतः 'यदा कदाचित', 'मी नथुराम गोडसे बोलतोय', 'लाली लीला', 'पोपटपंची', 'सारे प्रवासी घडीचे' या दमदार नाटकांमध्ये अभिनय केला आहे.

यासोबतच 'आभाळमाया', 'चारचौघी', 'एक झुंड वादळाशी', 'कुंकू' अशा मालिकांमधूनही ते झळकले आहेत. ठाण्या जिल्ह्यात त्यांनी मोठे सांस्कृतिक कार्य केले आहे. अनेक नाट्य स्पर्धांमध्ये त्यांनी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार पटकावला आहे. मनोरंजन विश्वात त्यांचा चांगला नावलौकिक होता. त्यांच्या जाण्याने मनोरंजन विश्वातील अनेक दिग्गजांनी हळहळ व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Council Seat Battle: पुणे विधान परिषद जागेसाठी राष्ट्रवादी-भाजपमध्ये रस्सीखेच

मिस पुणे ते कॉर्पोरेट कंपनीत सिनियर मॅनेजर; लग्नानंतर ५ महिन्यात मृत्यूने खळबळ, कोण होती ट्विशा?

Video : पहिला डाव संपला, MS Dhoni मैदानावर आला... CSK च्या खेळाडूंनी जे केलं, ते पाहून सारेच Emotional... 'माही'ची निवृत्ती?

मुंबईकरांसाठी मोठी आनंदवार्ता! भायखळा झूमध्ये ‘जंगलचा राजा’ लवकरच दिसणार; गुजरातकडून तत्त्वतः हिरवा कंदील

Meta Layoffs: मेटामध्ये छाटणी! कर्मचारी चवताळले; रागात ऑफिस आणि स्नॅक्स काउंटरमधील सामान लुटले, विचित्र किस्सा चर्चेत

SCROLL FOR NEXT