actor faraaz khan passes away pooja bhatt post viral
actor faraaz khan passes away pooja bhatt post viral 
मनोरंजन

फराज खानची मृत्युशी झुंज अखेर ठरली अपयशी

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई -  मेहंदी, फरेब यासारख्या चित्रपटांमध्ये काम करणा-या फराज खानवर गेल्या काही दिवसांपासून बंगलोरमधील एका हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. अखेर आजारपणामुळे त्याचे निधन झाले आहे. तो मेंदूच्या विकाराने मागील अनेक महिन्यांपासून त्रस्त होता. त्याच्याकडे उपचारासाठी पुरेसे पैसेही नव्हते. यासाठी अभिनेत्री पूजा भट हिने लोकांना मदतनिधीसाठी आवाहन केले होते. यावेळी बॉलीवूडचा भाईजान सलमान खान त्याच्या मदतीला धावून आला होता.

अभिनेत्री पूजा भटने फराजच्या निधनाबद्दल माहिती दिली आहे. तिने सोशल मीडियावर निधनाबद्दलची पोस्ट शेयर केली आहे. फराज हा खोकल्याच्या आजारानेही त्रस्त झाला होता. त्यासाठी त्याला बंगलोरच्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तो गेल्या काही दिवसांपूर्वी आयसीयुमध्ये होता. नंतर त्याच्या प्रकृतीत बिघाड होत गेल्याने त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. शेवटी त्याची प्राणज्योत मालवल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

याविषयी अधिक माहिती देताना पुजा भटने सांगितले की, आता फराज खान या जगात राहिलेला नाही. हे सांगताना माझ्या मनाला खुप वेदना होत आहेत. ज्यावेळी त्याला आपल्या सर्वांची गरज होती तेव्हा त्याला आपण सर्वांनी मोठा आधार दिला. त्याच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरुन येणारी नाही. आपल्या सर्वांची भावांजली त्याच्यासोबत असु देत. असे आवाहन तिने केले आहे.

फराजच्या उपचारासाठी त्याचा भाऊ फहमान खान याने आर्थिक मदतीसाठी आवाहन केले होते. त्यासाठी अभिनेता सलमान खान याने पुढाकार घेतला होता. आणि त्याच्या हॉस्पिटलचा सर्व खर्च त्याने करण्याचे मान्य केले होते. त्याप्रमाणे त्याने बील भरले होते.  फराजला उपचारासाठी 25 लाख रुपयांची गरज होती. यासाठी त्याच्या नावाने फंड उभारण्याचे काम सुरु करण्यात आले होते.  
 

 
 
  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari : '60 वर्षांत जेवढी विकासकामे झाली नाहीत, तेवढ्या कितीतरी पटीने अधिक विकासकामे आम्ही केली'

Tesla vs Tesla: ट्रेडमार्कवरून पेटला वाद! टेस्ला भारतीय कंपनीविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात; काय आहे प्रकरण?

Water Storage : पुणे जिल्ह्यातील धरणांनी गाठला तळ; फक्त १४ टक्के पाणीसाठा शिल्लक

Loksabha 2024: भाजपने कापली दहा खासदारांची उमेदवारी; वाचा कोणा कोणाचा पत्ता झाला कट

PCB T20 WC 24 : वर्ल्डकप सुरू होण्याआधीच हरायची तयारी! गॅरी कर्स्टन बळीचा बकरा... पाकिस्तानचा माजी खेळाडू हे काय म्हणाला?

SCROLL FOR NEXT