मनोरंजन

जॅकी श्रॉफ म्हणाले, 'बोल्ड सीनची जाम लाज वाटते'

जॅकी श्रॉफ यांचा 'द इंटरव्यू: नाइट ऑफ 26/11' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

प्रियांका कुलकर्णी

आपल्या हटके स्टाइलने आणि अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे कलाकार जॅकी श्रॉफ (jackie shroff) हे वेगवेगळ्या विषयावर त्यांची मतं मांडतात. त्यांचा मुलगा टायगर श्रॉफ (tiger shroff) सध्या बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आहे. नुकत्याच बॉलीवुड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी बोल्ड सीनबद्दल आपले मत व्यक्त केले.

जॅकी श्रॉफ यांचा 'द इंटरव्यू: नाइट ऑफ 26/11' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामध्ये जॅकी यांनी पत्रकाराची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट डच फिल्म 'द इंटरव्यू' चा रिमेक आहे. या चित्रपटामध्ये जॅकी यांचे अनेक बोल्ड सीन आहेत. हे बोल्ड सीन शूट करत असतानाचा अनूभव नुकत्याच एका मुलाखतीमध्ये जॅकी यांनी सांगितला. ते म्हणाले, 'मला ते सीन शूट करत असताना खूप लाज वाटत होती. सेटवरील अनेक लोक तुम्हाला पाहात असतात. डायरेक्टर,असिस्टंट अशा अनेक लोकांचे लक्ष तुमच्याकडे असते. असं वाटतं तो सीन शूट करत असताना सगळं जग तुमच्याकडे बघत आहे. पण तुम्हाला तुमचे काम करावे लागते.'

जॅकी यांचा ‘द इंटरव्यू: नाइट ऑफ २६/११’ हा चित्रपट 9 सप्टेंबरला ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. अक्षय कुमारच्या आगामी 'सूर्यवंशी' या चित्रपटातही देखील ते काम करणार आहेत. जॅकी यांच्या 'राधे: योर मोस्ट वांटेड भाई' या चित्रपटातील अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. या चित्रपटा सलमान खान, रणदीप हुड्डा आणि दिशा पटानी या कलाकरांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : मूक आक्रंदनाचा वारसा

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 4 जुलै 2025

Latest Maharashtra News Updates : कोल्हापुरात पंचगंगेच्या पातळीत एक फुटाने वाढ, ५० बंधारे पाण्याखाली

ढिंग टांग : वाजत गाजत या...!

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

SCROLL FOR NEXT