actor Junior Balaiah dies of suffocation at the age of 70  SAKAL
मनोरंजन

Junior Balaiah: धक्कादायक! राहत्या घरात गुदमरुन ज्येष्ठ अभिनेत्याचा मृत्यू

राहत्या घरात गुदमरल्याने रघु बलैया गतप्राण झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे

Devendra Jadhav

Junior Balaiah Death: दिग्गज तमिळ अभिनेते रघु बलैया उर्फ ज्युनियर बलैया यांचे 2 नोव्हेंबर 2023 रोजी पहाटे निधन झाले. चेन्नईच्या वलासरवक्कम येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांचा गुदमरल्याने मृत्यू झाला. वयाच्या ७० व्या वर्षी त्यांचं निधन झालं.

मिळालेल्या माहितीनुसार, आज संध्याकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनाची बातमी कळताच, चाहत्यांनी सोशल मीडियावर त्यांच्या हळहळ व्यक्त केली.

(actor Junior Balaiah dies of suffocation at the age of 70)

रघु बलैया दिवंगत ज्येष्ठ अभिनेते टीएस बलैया यांचा मुलगा. प्रेमाने ज्युनियर बलैया नावाने त्यांना ओळखलं जायचं. त्यांनी 1975 मध्ये 'मेलनाट्टू मारुमगल' मधून पदार्पण केले. त्यांच्या प्रसिद्ध चित्रपटांमध्ये 'करागतकरण', 'सुंदरा कंदम', 'विनर' आणि 'साताई' यांचा समावेश आहे.

रघु यांनी त्यांच्या कारकीर्दीत १०० हून जास्त सिनेमांमध्ये अभिनय केला. त्यांच्या अकस्मात निधनाने तामिळ सिनेमा आणि टीव्ही इंडस्ट्रीतील अनेक मान्यवर शोक व्यक्त करत आहेत. (Latest Entertainment News)

चित्रपटांव्यतिरिक्त, त्यांनी 'चिठी', 'वाझकई' आणि 'चिन्ना पापा पेरिया पापा' अशा टेलिव्हिजन शोमध्ये अभिनय केला होता.

2019 मध्ये अजित कुमारच्या 'नेरकोंडा परवाई' मध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका साकारली. हा सिनेमा 'पिंक' या बॉलिवुड सिनेमाचा अधिकृत तमिळ रिमेक होता.

2021 मध्ये प्रदर्शित झालेला 'येनंगा सर उंगा सट्टम' हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News : देशातील पहिल्या पर्यटन पाणबुडीच्या बांधणीला सुरुवात; २०२७ मध्ये प्रकल्प पूर्ण होणार

Nagpur Raid: नागपूरमध्ये कामोत्तेजना वाढवणारं बोगस औषध उजेडात! 'या' कॅप्सुलचा पर्दाफाश; अन्न व औषध प्रशासनाची रेड

Nasrapur Crime : नसरापूर अत्याचार-खून प्रकरणात सीसीटीव्ही, डीएनए पुराव्यांवरून आरोपीचा खोटेपणा उघड; २५ जूनला निकाल

Strait of Hormuz Closed: पुन्हा मध्यपूर्वेत युद्धाची चिन्हे? होर्मुझ सामुद्रधुनी बंद; इराणचा मोठा निर्णय, दिला मोठा इशारा

IND vs AFG: यशस्वी जैस्वालचे खणखणीत शतक अन् मग विजयी षटकार... भारताचा अफगाणिस्तानला व्हाईटवॉश

SCROLL FOR NEXT