actor kamal khan tweet on bjp government releted Anurag Kashyap income tax raid 
मनोरंजन

'कमाल' आहे 'खान'ची; भाजपनं केला पोलीस,आयटीचा वापर 

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - बॉलीवू़डचा प्रसिध्द दिग्दर्शक आणि अभिनेता अनुराग कश्यप, अभिनेत्री तापसी पन्नु यांच्या मुंबई आणि पुण्यातील काही जागेवर आयकर विभागानं छापा घातल्याची धक्कादायक बाब उडकीस आली. तेव्हापासून मोठी खळबळ उडाल्याचे दिसत आहे. मधू मंटेना यांची टॅलेंट मॅनेजमेंट कंपनी क्वानच्या (Kwaan) ऑफिसमध्येही आयकर विभागाचे अधिकारी पोहोचले आहेत. कर बुडवल्याप्रकरणी ही छापेमारी करण्यात असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.  यासगळ्या प्रकरणात आपल्या वादग्रस्त वक्तव्यासाठी प्रसिध्द असणा-या अभिनेता कमाल खान याचे एक वक्तव्य भलतेच चर्चेत आले आहे. 

कमाल खान हा सोशल मीडियावर चर्चेत असणारा अभिनेता आहे. तो चित्रपटाशिवाय बाकी इतर सर्व सोशल प्लॅटफॉर्मवर नेटक-यांचे लक्ष वेधून घेत असल्याचे दिसून आले आहे. आताही त्यानं जे वक्तव्य केलं आहे त्यामुळे वेगळाच मुद्दा समोर येण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.  आयकर विभागानं जी कारवाई केली आहे त्यात  तापसी, अनुराग आणि विकास बहल यांच्या घरी व कार्यालयावर छापेमारी सुरू केली होती. मात्र अद्याप त्यातून काही हस्तगत झाल्याची ठोस माहिती अद्याप समोर आली नाही.

कमालनं म्हटले आहे की, भाजपा सरकारने पोलीस, ईडी, आयटी डिपार्टमेंट, सीबीआय आणि एनसीबी यांचा वापर केला आहे’ असे व्टिट करुन वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न निर्माण केले आहेत. दुसरीकडे त्याने या ट्वीटच्या माध्यमातून मोदी सरकारकडे बोट केले आहे.कमाल आर खानचे ट्वीट वादाचा विषय ठरतो.  फँटम फिल्म्स ही एक खासगी निर्मिती संस्था आहे. 2010   मध्ये याची स्थापना झाली. 

अनुराग कश्यप, विक्रमादित्य मोटवाने, विकास बहल आणि मधू मंटेना यांनी मिळून या निर्मिती संस्थेची सुरुवात केली होती. विकास बहलवर एका महिलेने आणि अभिनेत्री कंगना रणौतने लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप केल्यानंतर 'फँटम फिल्म्स' ही निर्मिती संस्था बंद करण्यात आली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithviraj Chavan statement: 'ऑपरेशन सिंदूर'च्या पहिल्याच दिवशी झाला होता भारताचा पराभव - पृथ्वीराज चव्हाणांचं विधान!

IPL 2026 All Teams: ग्रीन सर्वात महागडा खेळाडू, तर अनकॅप्ड खेळाडूंही मलामाल; लिलावानंतर पाहा सर्व संघांतील खेळाडूंची यादी

IPL 2026 Auction Live: जाता जाता Prithvi Shawला दिलासा! एका फ्रँचायझीला आली दया... घेतलं एकदाचं संघात, बघा कोणाकडून खेळणार

PL 2026 Auction : पप्पू यादव यांचा मुलगा आयपीएलमध्ये खेळणार; लिलावात मोजली तगडी रक्कम, जाणून घ्या कोणत्या संघाची झाली कृपा

मोठी बातमी! सिडनीतील दहशतवादी हल्ल्याचं भारतीय कनेक्शन उघड; तेलंगणा पोलिसांनी केली पुष्टी...

SCROLL FOR NEXT