actor kiran honored with satara natya gaurav award actor shared emotional post about old memory  sakal
मनोरंजन

Kiran Mane: जिथल्या पायर्‍यांवर बसून मी.. किरण माने यांचा 'या' बहुमानाच्या पुरस्काराने सन्मान..

किरण माने यांची पोस्ट चर्चेत..

नीलेश अडसूळ

kiran mane: skiran mane: सातारचा बच्चन म्हणून प्रसिद्ध असलेले अभिनेते किरण माने सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. सातत्याने ते काहीना काही पोस्ट करत असतात. मनोरंजन विश्वातील घडामोडी असो किंवा राजकीय हालचाली.. जे जे खटकेल त्यावर निर्भीडपणे टीका करणारा आणि पटेल त्याचे तोंड भरून कौतुक करणारा अभिनेता म्हणजे किरण माने अशी त्यांची ओळख आहे.

बिग बॉस मराठी नंतर त्यांच्या प्रसिद्धीत मोठी वाढ झाली असून त्यांचे चाहते आता महाराष्ट्रभर पसरले आहेत. साताऱ्यात लहानाचा मोठा झालेले किरण माने कायमच साताऱ्या विषयी भरभरून बोलत असतात. याच साताऱ्याने आज त्यांचा मोठा सन्मान केला आहे. याच निमित्ताने किरण माने यांनी आठवणींना उजाळा दिला आहे.

(actor kiran honored with satara natya gaurav award actor shared emotional post about old memory)

राजधानी सातारा असा फोटो शेयर करत किरण माने म्हणतात, ''सातारा आर्ट फ्यूजन फेस्टिव्हल 2023' मध्ये मला 'सातारा नाट्य गौरव' पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे. ज्या शाहू कलामंदिरच्या मंचावर मी सुरूवातीला उभा राहिलो...''

''पहिली एकांकिका स्पर्धा केली... पहिलं नाटक केलं... जिथल्या पायर्‍यांवर बसून मी अभिनेता बनायची स्वप्नं बघितली... ज्या मंचावर निळु फुले, डाॅ. श्रीराम लागू, राजा गोसावी, यशवंत दत्त, नाना पाटेकर यांची नाटकं बघत स्वत:ला घडवायचा प्रयत्न केला..''

''जिथं मी प्रमुख भुमिकेत मुंबईच्या तब्बल दहा व्यावसायिक नाटकांचे दिमाखात प्रयोग केले... त्या स्टेजवर सन्मानित होणं हे माझ्यासाठी खूप खूप मोलाचं आहे, समाधानाचं आहे, संघर्षाचं सोनं करणारं आहे... पुढील वाटचालीसाठी शंभर हत्तींचं बळ देणारं आहे!''

पुढे ते म्हणतात,''ज्या रंगकर्मीनं मला प्रायोगिक रंगभुमीची ओळख करून दिली... आशयघन नाटकांच्या अनोख्या विश्वात नेलं... त्या गुरूतुल्य तुषार भद्रे यांनी हा सन्मान मला जाहिर करावा यासारखा आनंद नाही.''


''आर्ट फ्यूजन फेस्टिव्हलमधल्या सातारा नाट्य गौरव पुरस्काराचं हे पाचवं वर्ष. खरंतर पहिल्या वर्षीच तुषार भद्रेंनी मला हा पुरस्कार देऊ केला होता... पण त्यावेळी मी परदेश दौर्‍यावर असल्यानं शक्य झालं नव्हतं. मागच्या वर्षीही त्यांनी मला विचारलं होतं..''

''पण मी नेमक्या त्या तारखा शुटिंगसाठी दिल्या होत्या. भद्रे म्हणाले, "किरण, खरंतर त्यावेळी शक्य नाही झालं हे बरं झालं. यावर्षी सगळ्या विपरित परिस्थितीशी झुंज देऊन, तू जग जिंकून आला आहेस. आता तुला हा पुरस्कार मिळणं हा या पुरस्काराचा सन्मान वाढवणारं ठरणार आहे. खूप खूप आभार तुषारजी !'' अशी पोस्ट किरण माने यांनी शेयर केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Municipal Election: महापालिका निवडणुकीत खेळीमेळी की खेळी? बिनविरोध विजयांमागचं सत्य आयोग शोधणार; अहवाल मागवला, आता चौकशी होणार!

Nawab Malik: मराठी-उत्तर भारतीय वादात नवाब मलिकांची एन्ट्री; महापौर पदावर राष्ट्रवादीचा हक्क सांगितला, भाजपवर टीका करत म्हणाले...

Arjun Tendulkar: अर्जुनचा पुन्हा फ्लॉप शो! गोवा संघाची हार, सूर्यवंशीच्या ८७ चेंडूंत नाबाद ११५ धावांनी गाजवला सामना

Pune News: कुंजीरवाडीच्या माजी सदस्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; कुटुंब थोडक्यात बचावले, प्रसंगावधान राखल अन् काय घडलं!

Latest Marathi News Live Update : संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरात बिबट्या जेरबंद

SCROLL FOR NEXT