actor KRK angry rection on pathaan movie said shah rukh khan this is India, not Pakistan… sakal
मनोरंजन

KRK On Pathaan: हा भारत आहे, पाकिस्तान नाही.. शाहरुखच्या 'पठाण'वर केआरकेची टीका..

अभिनेता 'केआरके'नेही शाहरुखच्या पठाणवर खळबळजनक भाष्य केलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

बॉलिवूडमध्ये कमाल राशिद खान हे नाव घेतले की अनेक चर्चा आणि वाद समोर येतात.  केआरके नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने वादग्रस्त विधाने करत असतो. इतकेच नव्हे तर त्याच्या चुकीच्या वक्तव्यामुळे त्याला अनेकदा तुरुंगातदेखील जावे लागले आहे. केआरके असं काहीही अर्थहीन पोस्ट करतो आणि ट्रोलच्या निशाण्यावर येतो. अशीच एक पोस्ट त्याने 'पठाण' सिनेमाविषयी केली आहे.

(actor KRK angry rection on pathaan movie said shah rukh khan this is India, not Pakistan…)

झालं असं की, शाहरुख खानचा आणि दीपिका पदुकोण यांचा पठाण आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटातील दोन गाणी प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. पठाणमधील 'झूमे जो पठाण' हे गाणं देखील नुकतच रिलीज झालं. या गाण्यातील शाहरुखच्या फिटनेसनं आणि दीपिकाच्या ग्लॅमरस लूकनं अनेकांचं लक्ष वेधलं. आता शाहरुख आणि दीपिकाच्या या गाण्यावर कमाल आर खान उर्फ ​​केआरकेनं अशी प्रतिक्रिया दिली आहे की युजर्सने त्याचीच फजिती केली.

केआरकेनं नुकतच एक ट्वीट शेअर केलं आहे. या ट्वीटमध्ये त्यानं लिहिलं, 'मी झूमे जो पठाण हे गाणं पाहिलं.  या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर कोणी वाचवू शकत नाही. शाहरुख भारतातील प्रेक्षकांसोबत पंगा घेत आहे. शाहरुख, हा भारत आहे, पाकिस्तान नाही. ' इतकेच नव्हेतर तर त्यांनी या गाण्यावर वर "मुघलांची वाह वाह..'' असे देखील त्याने पोस्ट केले आहे.

एका नेटकऱ्यानं केआरकेच्या ट्वीटला रिप्लाय देऊन त्याला ट्रोल केलं आहे. 'शाहरुख खाननं असं कधीच केलं नाही. असे दिसते की, तुम्ही तो विद्यार्थी आहात ज्याला अमेरिकेचा प्रश्न विचारला जातो आणि तो त्याचा संबंध आफ्रिकेशी जोडतो! .. तर एकाने म्हंटले आहे, ''तुझ्या रिव्ह्यूचा आमच्यावर काही परिणाम होत नाही.'.. तर एक म्हणतो, "केआरके एकतर तुला बॉलीवूडमध्ये कोणी विचारत नाही तरीही तु पुढे पुढे करतो".. एकाने तर " तु तर अर्थहीन माणूस आहेस आणि तुझे ट्वीट पण तुझ्या सारखे अर्थहीन"असे म्हंटले आहे. "तु तर शाहरूख खान वर जळतो हे दिसून येत आहे " असे म्हणत एकाने युजर्स ने तर चक्क त्याला देशद्रोही म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT