Mithun Chakraborty Health Update 
मनोरंजन

Mithun Chakraborty Health Update : अभिनेते मिथुन चक्रवर्तींना नेमकं काय झालं? डॉक्टरांनी दिली हेल्थ अपडेट

Mithun Chakraborty Health Update Latest News : ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांची तब्यत बिघडल्याची माहिती काल समोर आली होती.

रोहित कणसे

Mithun Chakraborty Health Update Latest News : ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांची तब्यत बिघडल्याची माहिती काल समोर आली होती. यानंतर त्यांना कोलकाता येथील एक खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मिथुन यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता रुग्णालयाकडून स्टेटमेंट जारी करण्यात त्यांच्या आरोग्याबद्दल अपडेट देण्यात आली आहे.

अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना स्ट्रोक आला होता, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना Ischemic Cerebrovascular Stroke आला होता. कोलकाता येथील प्रायव्हेट रुग्णालयात मिथुन यांच्यावर उपचार सुरू आहेत. तसेच डॉक्टरांच्या टीमकडून त्यांची देखभाल केली जात आहे. मिथुन यांच्या तब्येतीत सुधारणा होत असून ते पूर्णपणे कॉन्शियस आहेत, तसेच त्यांना शरीरातील खालच्या भागात थोडा अशक्तपणा असल्याचे सांगण्यात आले आहे.

नॅशनल अवॉर्ड विजेते ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना छातीत दुखत असल्यान प्रायव्हेट रुग्णालयात सकाळी ९ वाजून ४० मिनीटांनी भरती करण्यात आले होते. मिथुन यांच्या डोक्याचा एमआरआय, रेडियोलॉजी आणि इतर अनेक टेस्ट देखील करण्यात आल्या. त्यांना डोक्याशी संबंधीत Ischemic Cerebrovascular Accident (Stroke) आला होता. सध्या ते पूर्णपणे शुद्धीत आहेत आणि त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. त्यांना डॉक्टरांनी सॉफ्ट डायटवर ठेवलं आहे. न्यूरोफिजीशियन त्यांची काळजी घेत आहेत. याशिवाय कार्डियवस्कुलर आणि गॅस्ट्रोएंटेरोलॉजिस्ट देखील त्यांच्या तपासण्या करत आहेत.

त्यांच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास अभिनेते मिथुन चक्रवर्ती हे २०२३ मध्ये सुमन घोष यांचा सुपरहिट बंगाली चित्रपट काबूलीवाला (Kabuliwala) मध्ये दिसले होते. तसेच २०२२ मध्ये त्यांनी विवेक अग्निहोत्री यांचा चित्रपट द काश्मिर फाइल्समध्ये भूमिका केली होती. त्यांना या भूमिकेसाठी फिल्मफेअर अवॉर्ड देखील मिळाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : आज काँग्रेस करणार महात्मा गांधीच्या पुतळ्याचे रक्षण

Lottery Scam : लॉटरीच्या नावाखाली दाम्पत्याने 600 लोकांना 40 कोटींचा घातला गंडा; लोकांनी 5 ते 10 लाखांपर्यंत केली होती गुंतवणूक

Maharashtra Rain Update News : राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस, पुढील पाच दिवस महत्वाचे; ११ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी

IT Park:'जमीन पसंत पडेना, आयटी पार्क होईना'; प्रशासनाचा कागदी खेळ, कृषि महाविद्यालयला पर्यायी प्रस्ताव मान्य नाही

Indian Railways: मिनिटाला निघणार दीड लाख तिकिटे; रेल्वे प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय,आरक्षण केंद्रातील यंत्रणेत बदल

SCROLL FOR NEXT