actor model milind soman interview his viral photo on social media goa beach 
मनोरंजन

‘ जर का देवानं आपल्याला असे बनवले आहे तर मग...’ 

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - अभिनेता आणि मॉडेल मिलिंद सोमण हा कायम चर्चेत राहणारा अभिनेता आहे. मागे तो त्याच्या हॉट फोटो शुटमुळे जास्त प्रकाशक्षोतात आला होता. त्याने त्या फोटोचं समर्थनही केले होते. पुढील दिवसांत त्याचा पौरुषपूर नावाची एक मालिका प्रसिध्द होत आहे यावरुन त्यानं वेगवेगळ्या प्रकारचे लुक करण्यास सुरुवात केली होती. ते सोशल मीडियावर त्याला चाहत्यांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत होता.

गेल्या काही महिन्यांपूर्वी मिलिंद सोमणचा समुद्र किनारी धावताना एक हॉट फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यावरुन मिलिंदवर टीकाही झालीही होती. त्याच्यावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. गोव्यात केलेल्या या फोटोशुटवरुन मिलिंदवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र यासगळ्या प्रकारावर मिलिंद म्हणाला की, असं काहीही माझ्या कानावर आलेला नाही. मी आताच काही अशाप्रकारचे हॉट फोटोशुट केलेलं नाही. यापूर्वीही मी ते केलं आहे. मग त्यावरुन मला ज्याप्रकारे ट्रोल करण्यात येत आहे ते कशासाठी हे कळायला मार्ग नाही. '

गोव्यातही मी फोटोशुट केले आहे, त्यावरुन ज्या पध्दतीनं चर्चा करण्यात आली ते चूकीचे होते. हे सांगावे लागेल. ‘पिपिंगमून’ या वेबसाइटला मिलिंदने मुलाखत दिली आहे. तो म्हणाला, “मी जेव्हा एखादे हॉट फोटोशूट करतो, तेव्हा मला त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येतात. मला एक कळत नाही ते म्हणजे देवानं जसे आपल्याला बोलावले आहे त्याप्रमाणे आपण आता इंटरनेटवर लोकांना पाहू शकत नाही. हे सांगावे लागेल. इन्स्टाग्रामवर अशाप्रकारचे अनेक फोटो असतात. प्रत्येकाचे विचार आणि प्रत्येकाची स्वप्नं वेगवेगळी आहेत. माझ्यावर गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावर हॉट फोटोशूटच्या कारणावरुन कोणतीही तक्रार दाखल झाली नाही. असेही त्यानं यावेळी सांगितले.

मिलिंद ‘पौरषपूर’ या आगामी वेब सीरिजमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहे. त्या मालिकेत तो एका वेगळ्याच लुकमध्ये दिसून आला आहे. नाकात नथ घालून त्यानं हा फोटो शेयर केला होता.  तर आपल्या 55 व्या वाढदिवसानिमित्ताने तो गोव्याच्या समुद्रकिना-यावर धावला होता. त्यावेळी त्यानं एक हॉट फोटो सोशल मीडियावर शेयर केल्यानं त्याला टीकेला सामोरं जावं लागलं होतं. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder 5 KG पाच किलो एलपीजी सिलिंडरबाबत नवा नियम, खरेदीसाठी ओळखपत्र बंधनकारक

बारामतीत काँग्रेसनं उमेदवारी दिलेले आकाश मोरे कोण? अजित पवारांच्या विरोधात डिपॉझिट झालेलं जप्त

RCB vs CSK: अरे काय केलं... विराट कोहलीचा शिवम दुबेने एकदम सोपा कॅच सोडला; अनुष्का शर्माही शॉक; Video Viral

अल्पवयीन बहिणींच्या लग्नाचा घाट, पोलिसांसह अधिकाऱ्यांनी रोखला बालविवाह

IPL 2026: १९ षटकार... टीम डेव्हिडची वादळी फटकेबाजी, पडिक्कलचीही फिफ्टीच; CSK विरुद्ध RCB च्या अडीचशे धावा पार

SCROLL FOR NEXT