मनोरंजन

'भविष्यावर नव्हे कष्टावर विश्वास, नावाचं स्पेलिंग बदलणाऱ्यांचा राग'

बॉलीवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यपनं त्याच्या गँग्स ऑफ वासेपूरमध्ये त्याला प्रमुख भूमिका दिली.

युगंधर ताजणे

भविष्यावर astrology विश्वास ठेवून त्यानुसार आपल्या नावाच्या स्पेलिंगमध्ये बदलणाऱ्या सेलिब्रेटींची कमी नाही. एवढेच नाही तर त्यासाठी वेगवेगळे उपाय करणारेही कलाकार आहे. बॉलीवूडमध्ये bollywood अॅस्ट्रॉलॉजीवर विश्वास ठेवणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. त्यात अनेक दिग्गज अभिनेते आणि अभिनेत्रींचा समावेश आहे. यासगळ्या प्रकारावर जेव्हा सध्याचा आघाडीचा अभिनेता नवाझुद्दीन सिद्धीकीला nawazuddin siddiqui विचारण्यात आले तेव्हा त्यानं दिलेलं उत्तर त्याच्या चाहत्यांच्या चर्चेचा विषय झाला आहे. याअगोदर अनेकदा नवाझुद्दीननं आपल्या परखड स्वभावाचा परिचय करुन दिला आहे.

हिंदूस्थान टाईम्समध्ये नवाझुद्दीनची एक मुलाखत प्रसिद्ध झाली आहे. त्यात त्यानं भविष्य आणि बॉलीवूडमध्ये चालणारे प्रकार यावर आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्यानं सांगितलं, मी कष्टावर विश्वास ठेवणारा माणूस आहे. भविष्यावर नाही. दैव हे माणसाच्या हातात असते. यावर माझी श्रद्धा आहे. त्यामुळे अनेकदा याप्रकाराच्या निमित्तानं येणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टींपासून मी लांब राहण्याचा प्रयत्न केला आहे. मलाही अनेकदा याबाबत प्रश्न विचारण्यात आले आहे. मात्र त्यावर माझी ठाम भूमिका आहे. ती म्हणजे कष्ट करत राहणं.

मी ज्या क्षेत्रात काम करतो त्यात भविष्य पाहणं त्यानुसार संबंधितांना ज्यांनी सल्ले दिले आहेत ते अंमलात आणणाऱ्यांची कमी नाही. बहुतांशी अनेक सेलिब्रेटी त्यांच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये बदल करतात. मला ती गोष्ट खटकते. मी कुठल्याही प्रकारची अंगठी, ब्रेसलेट घालत नाही. आणि मी बुवाबाजीवर विश्वासही ठेवत नाही. कुठल्याही गोष्टीवर अंधपणानं विश्वास ठेवणं मला काही मान्य नाही. नवाझुद्दीनचा बॉलीवूडमधला प्रवास मोठा आहे. त्यानं स्वताला खडतर संघर्षातून सिद्ध केलं आहे.

बॉलीवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यपनं त्याच्या गँग्स ऑफ वासेपूरमध्ये त्याला प्रमुख भूमिका दिली. आणि नवाझुद्दीनचं लाईफ चेंज झालं. असं म्हटलं जातं. त्यानंतर या अभिनेत्यानं काही मागे वळून पाहिलं नाही. या चित्रपटानंतर त्यानं अनेक हिट चित्रपट दिले. मात्र गँग्स ऑफ वासेपूरची गोष्टच वेगळी होती. त्यातून नवाझुद्दीन सिद्धिकी काय ताकदीचा अभिनेता आहे हे कळून येते. जे सेलिब्रेटी कुणाच्या सांगण्यावरुन आपल्या नावाच्या स्पेलिंगमध्ये बदल करतात मला त्यांच्याविषयी राग आहे. असंही नवाझचं म्हणणं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : इन्स्टाग्रामवरील व्हिडिओच्या वादातून नववीतील विद्यार्थिनीवर चाकू हल्ला; बावधन परिसरातील शाळेतील घटना

बुध वक्री होताच वृषभसह ६ राशींच्या अडचणी वाढणार; व्यवसायाबाबत निर्णय घेताना सावधगिरी गरजेची

Anjali Arora controversial exit : ३ लाख रुपये घेतले अन् १२ व्या मिनिटाला स्टेजवरून पळाली; अंजली अरोराच्या 'त्या' नखऱ्यांमुळे आयोजकांचा मोठा दणका!

IMD weather forecast 24 October : २४ ऑक्टोबरला देशातील हवामानात मोठा उलटफेर; गुलाबी थंडी वाढणार की पावसाची एन्ट्री? पाहा हवामानाचा नवा अंदाज!

शिवरायांच्या स्वराज्याची शान! महाराष्ट्रातील ‘या’ 5 किल्ल्यांना एकदा तरी भेट द्याच

SCROLL FOR NEXT