Nawazuddin wife alia is in legal trouble  esakal
मनोरंजन

Nawazuddin Siddiqui ची पत्नी आलिया कायद्याच्या कचाट्यात,नेमकं काय आहे प्रकरण...

३१ लाखाच्या रकंमेवरून हा वाद झाला.आणि आलिया नवाजुद्दीन कायद्याच्या कचाट्यात अडकलीय.

सकाळ डिजिटल टीम

बॉलीवुड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीची पत्नी आलिया सिद्दीकी सध्या चर्चेत आहे.त्याला कारणही तसंच आहे.आलियाविरोधात 'होली काऊ' या प्रोडक्शन कंपनीची को प्रोड्यसर मंजू गढवाल हिने पोलीसात तक्रार केली आहे.३१ लाखाच्या रकंमेवरून हा वाद झाला.आणि आलिया नवाजुद्दीन कायद्याच्या कचाट्यात अडकली.

आलियावर फसवणुकीचा आरोप करत मंजू गढवाल हिने आलियाविरोधात ही तक्रार केलीय.मंजूने ३१ लाखाची रक्कम चित्रपटात लावली होती.जेव्हा मंजूने ही रक्कम आलियाला परत करण्याबाबत विचारणा केली असता तिने ही रक्कम परत करण्यास टाळाटाळ केली.मंजूच्या अनेक वेळा केलेल्या मागण्यांनंतरही आलियाने पैसे परत केले नाही तेव्हा तिने आलियाविरोधात तक्रार केली.(Nawazuddin Siddiqui) याशिवाय मानसिक छळ केल्याचा आरोपही तिने आलियावर केल्याचं कळतंय.

मंजू गढवालने लावला हा आरोप

एका मुलाखतीत मंजू म्हणाली,'मी आणि आलिया २००५ पासून चांगल्या मैत्रिणी आहोत.आलियाला दिग्दर्शक व्हायचं होतं.त्यावेळा आलियाच्या म्हणण्यानूसार तिने फायनांसचं काम बघितलं आणि मी क्रिएटिव्हचं.मी कास्टिंग केली होती.पण त्याचे चेक बाऊंस झालेत.पुढे ती सांगते की आलियाच्या सांगण्यावरून मंजूच्या वडिलांनी प्रोजेक्टमध्ये पैसे लावले.'

घर विकून मंजूच्या वडिलांनी दिले होते पैसे

मंजू पुढे सांगते की,'मंजूला माहिती होतं की माझे वडिल त्यांच उज्जैन मधलं घर विकणार आहेत.आलियाने माझ्या बाबांची समजून काढून घर विकल्यानंतर घराचे पैसे त्यांच्याकडून पैसे घेतले होते.१ महिण्यात परत करते सांगून आलियाने पैसे घेतले होते आणि अजून परत केलेले नाही.'आलियाने नंतर काऊ प्रोडक्शन हाऊसमध्ये मंजूला क्रेडिट देण्यासही नकार दिला.आलियाने अजूनही मंजूचे ३१ लाख परत केले नाहीत.पोलीस तक्रारीबरोबरच FWICE मध्येही मंजूने आलियाविरोधात तक्रार केलीय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Will MS Dhoni Play IPL 2027? महेंद्रसिंग धोनी पुढच्या वर्षी पिवळ्या जर्सीत दिसेल का? ऋतुराज गायकवाडचं उत्तर, नेमकं काय म्हणाला?

IPL 2026 Playoff Scenario : चेन्नईचे आव्हान संपुष्टात! गुजरातची Qualifier 1 साठी दावेदारी; आता एका जागेसाठी चार संघांमध्ये स्पर्धा

Abhijeet Dipke: दिल्लीत पोहोचताच पोलीस तिहार जेलमध्ये टाकतील... ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपकेंना भीती सतावतेय

Congress politics : ‘कॉक्रोच जनता पक्ष’ हा असंतोषाचा इशारा; काँग्रेसला नव्याने उभारी देण्याचे हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन

NEET Paper Leak: नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरचे बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे सीबीआय ताब्यात; मुलासाठी प्रश्नपत्रिका खरेदीचा आरोप

SCROLL FOR NEXT