actor Pankaj Tripathi play handpan instrument video viral on social media  
मनोरंजन

कालीनभैय्या चक्क 'हॅन्डपॅन' वाजवतोय, व्हिडिओ व्हायरल 

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - मिर्झापूरमध्ये पंकज त्रिपाठीनं कालीनभैय्याची भूमिका साकारली होती. ती कमालीची लोकप्रिय झाली होती. प्रेक्षकांनी कालीनभैय्याला डोक्यावर घेतली होती. मिर्झापूरच्या दोन्ही सीझनला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. दुस-या सीझनची गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षक वाट पाहत होते. तो सीझन प्रदर्शित झाल्यानंतर अनेकांनी रात्रभर जागून ती मालिका पाहिली होती. एवढी क्रेझ कालीनभैय्याची होती. ही भूमिका साकारणारा पंकज त्रिपाठी सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

पंकज त्रिपाठीचा 'हॅन्डपॅन' वाजवतानाचा एक व्हिडिओ सर्वाचं लक्ष वेधून घेतो आहे. ते वाद्य वाजवताना तो तल्लीन झाल्यानं त्या वाद्याचा वाद्यानंद त्यानं मनसोक्त घेतला आहे. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. काही दिवसांपूर्वी पंकज यांचा कागज नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. तो प्रेक्षकांच्या पसंतीस पडला होता. सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात कागदाला असणारं महत्व आणि त्याच्याशी जोडल्या गेलेल्या मानवी भाव भावना यांचे प्रभावी चित्रण कागज या चित्रपटात करण्यात आले होते. त्यात पंकज यांची भूमिका कमालीची लोकप्रिय झाली होती. वास्तव घटनेवर आधारित असलेल्या या चित्रपटानं जाणकार प्रेक्षक आणि समीक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते.

पंकज यांचा क्रिमिनल जस्टीस नावाच्या मालिकेचा 2 रा सीझनही काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता. त्यातही एका वकिलाची केलेली भूमिका त्यांच्या लोकप्रियतेत वाढ करणारी होती. आपल्या अभिनयानं वेगळं स्थान आणि यश संपादन करणारे अभिनेते म्हणूनही पंकज याचे नाव घ्यावे लागेल. साधारण दोन ते तीन वर्षांपासून त्रिपाठीचा अभिनय चांगलाच बहरत चालल्याचे दिसून आले आहे. याबरोबरच सोशल मीडियावर त्यांनी घेतलेला सक्रिय सहभाग हाही त्यांचा फॅन फॉलोअर्स वाढविण्यास हातभार लावत आहे.

अभिनेता पंकज त्रिपाठी त्याच्या अभिनयासाठी तर प्रसिद्ध आहेच परंतु त्याने आता त्याचा म्यूजिकल लूक प्रेक्षकांसमोर आला असून त्याला मिळणारे लाईक्स वाढत आहेत.  पंकज त्रिपाठीने त्याच्या सोशल मीडियावरून   'हॅन्डपॅन' वाजवण्याचा व्हिडीओ शेयर केला आहे. त्याचा हा व्हिडीओ त्याच्या चाहत्यांसाठी मंत्रमुग्ध करणारा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpati Visarjan 2025 Live Updates : पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात, मानाचे गणपती मार्गस्थ, गणेश भक्तांचा उत्साह

BCCI Sponsorship 2025 : नव्या प्रायोजकातून बीसीसीआय ४०० कोटींहून अधिक कमवणार? नेमका प्लॅन काय?

Ladki Bahin Scheme : 'या' कारणामुळे ‘लाडकी बहीण’ ठरणार अपात्र, नवा नियम काय सांगतो

Pune Rain : पुणे परिसरात आज पावसाचा अंदाज; बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता

Red - White Onion: लाल आणि पांढरा कांदा खाताय? हे नक्की वाचाचं

SCROLL FOR NEXT