actor power star pawan kalyan birthday three wives, kids, political background sakal
मनोरंजन

१६ वर्षांत तीन लग्न, राजकारणातही सक्रिय; जाणून घ्या सुपरस्टार पवन कल्याण बद्दल..

पवन कल्याण हे नाव बॉलिवूडकरांसाठी जरी कधी कधी ऐकलं जाणारं नाव असलं तरी दाक्षिणात्य सिनेप्रेमींसाठी ते सुपरस्टारच आहेत.

नीलेश अडसूळ

pawan kalyan birthday : पवन कल्याण हे नाव बॉलिवूडकरांसाठी जरी कधी कधी ऐकलं जाणारं नाव असलं तरी दाक्षिणात्य सिनेप्रेमींसाठी अजिबात नवीन नाही. सुपरस्टार अशी पवन कल्याण यांची ओळख. हिंदी चित्रपट खुशीचा रिमेक दाक्षिणात्य खुशी चित्रपट भूमिका चावला बरोबर अभिनय केला होता. (actor power star pawan kalyan birthday three wives, kids, political background)

दाक्षिणत्य सुपरस्टार पवन कल्याण आज २ सप्टेंबर रोजी ५० वा वाढदिवस साजरा करत आहेत. पवन कल्याण मेगास्टार चिरंजीवी यांचा लहान भाऊ आहे. पवन यांचा जन्म बपतलामध्ये झाला आणि त्यांचे खरे नाव कोन्निडेला कल्याण बाबू असे आहे. त्यांनी सिनेमात काम करण्यासाठी पवन कल्याण हे नाव ठेवले. मात्र दाक्षिणात्य सिनेमांत त्यांना पावर स्टार नावाने ओळखले जाते.

पवन यांनी अभिनय क्षेत्रातून राजकारणात प्रवेश केला आणि तिथेदेखील लोकप्रिय झाले. त्यांनी १९९७ मध्ये 'गोकुलामलो सीता' या तेलगु सिनेमातून अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी अनेक लोकप्रिय सिनेमांत काम केले. यात 'बद्री', 'जॉनी', 'अन्नावरम', 'पुली' आणि 'गब्बर सिंग' या सिनेमांचा समावेश आहे.

actor power star pawan kalyan birthday three wives, kids, political background

पवन कल्याणने १६ वर्षांत केले तीनवेळा लग्न

पवन कल्याण यांनी राजकीय क्षेत्राबरोबरच अभिनयाच्या क्षेत्रातही स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. अतिशय बहुआयामी व्यक्तिमत्व असलेले पवन कल्याण उत्कृष्ट दिग्दर्शक, गायक आणि पटकथा लेखकही आहेत. पवन यांच्या फिल्मी आणि राजकीय करिअरसोबतच त्यांचे व्यक्तिगत आयुष्यही कायम चर्चेत असते.

पवन कल्याण यांचे व्यक्तिगत आयुष्य कोणत्याही सिनेमाच्या कथेइतकेच रंजक आहे. त्यांनी १६ वर्षांत तीन लग्ने केली. त्याच्या पहिल्या बायकोचे नाव नंदिनी होते. तिच्याशी त्यांनी १९९७ मध्ये लग्न केले. परंतु त्यांच्या नात्यामध्ये तणाव निर्माण झाल्याने त्यांना १९९९ मध्ये घटस्फोट झाला. त्यानंतर पवन यांनी रेणू देसाईशी लग्न केले. लग्नानंतर काही दिवसांतच या दोघांमध्ये वाद होऊ लागले. पवन आणि रेणू यांना एक मुलगा अकिरा आणि एक मुलगी आध्या आहे. दोन मुले झाल्यानंतर या दोघांनी लग्नानंतर अवघ्या तीन वर्षांत घटस्फोट घेतला आणि वेगळे झाले.

त्यानंतर राजकीय क्षेत्रात पूर्णवेळ सक्रीय झालेल्या पवन कल्याणने तिसरे लग्न केले. परदेशी असलेल्या बाला अन्ना लेजनेवाशी त्यांनी लग्न केले. या दोघांची भेट २०११ मध्ये झाली. त्यानंतर या दोघांनी लग्न केले. या दोघांना त्याचवर्षी एक मुलगी झाली. त्यानंतर एक मुलगा झाला त्याचे नाव मार्क शंकर पवनोविच असे आहे.

पवन कल्याणने त्याचा मोठा भाऊ चिरंजीवीच्या पावलावर पाऊल ठेवत राजकारणात प्रवेश केला. पवन कल्याण २००८ मध्ये प्रजा राज्यम पक्षात सहभागी झाले. काही वर्षानंतर पवन यांनी स्वतःचा जन सेना पक्षा स्थापन केला. त्यानंतर त्यांनी भाजपला पाठिंबा दिला आणि सत्तारुढ तेलुगु देशम पार्टीसोबत मिळून पंतप्रधान मोदींचा प्रचार केला. दरम्यान, आता पवन यांनी आंध्र प्रदेशला विशेष दर्जा मिळाल्यानंतर भाजपसोबतचे सर्व संबंध तोडून टाकले. सध्या पवन कल्याण काही महत्त्वाचे मुद्दे घेऊन राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cyber Fraud Alert: सायबर फसवणुकीचा नवा प्रकार; काय आहे 401# कोड आणि त्याचे धोके, जाणून घ्या आणि आताच सावध व्हा!

Python Enters House Video: भयानक! मोबाइल बघत बसली होती मुलं, तितक्यात घरात शिरला महाकाय अजगर अन् मग...

Latest Marathi News Updates: शिवसेना नेत्या शायना एनसी यांनी उज्ज्वल निकम यांचे केले अभिनंदन

पार्किंगपासून ते दुकानाच्या भाड्यापर्यंत...; विमानतळावर सर्व महाग होणार, टीडीएसएटीच्या मोठ्या निर्णयानं टेन्शन वाढवलं

Viral Video : प्रियकरासोबत वारंवार फरार व्हायची पत्नी; घटस्फोट होताच पतीने दुधाने आंघोळ करत जल्लोष साजरा केला अन्...

SCROLL FOR NEXT