actor prakash raj tweet on pm narendra modi controversial tweet viral  Esakal
मनोरंजन

Prakash Raj: "जेव्हा राजा सत्तेसाठी भुकेला असतो",जागतिक उपासमार निर्देशांकाचा हवाला देत प्रकाश राज यांची मोदींवर जहरी टीका!

Vaishali Patil

Prakash Raj: प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज हे त्यांच्या चित्रपटांपेक्षा त्यांच्या परखड वक्तव्यांसाठी चर्चेत असतात. प्रकाश यांनी त्यांच्या अभिनयाने मनोरंजन विश्वात वेगळी ओळख निर्माण केली आहे. समाजातील वेगवेगळ्या घडामोडी असो किंवा राजकारणातील काही विषय प्रकाश हे तितक्याच पोटतिडकीनं भूमिका घेत ठामपणे बोलत असतात.

दरम्यान प्रकाश राज यांना त्यांच्या वक्तव्यामुळे अनेकदा टीकेचा सामना करावा लागतो. मात्र तरी देखील प्रकाश राज आपलं मत स्पष्टपणे मांडत असतात. मग तो राजकिय विषय असो किंवा इतर काही.

अशातच त्यांनी पुन्हा एक ट्विट सोशल मीडियावर शेयर करत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. Global Hunger Index 2023च्या अहवालवरुन त्यांनी मोदींवर टीका केली आहे.

जागतिक भूक निर्देशांक 2023 चा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. यामध्ये भारताची स्थिती गेल्या वर्षीच्या तुलनेत बिकट झाली आहे. 125 देशांच्या या अहवालात भारत 111 व्या स्थानावर आला आहे. या अहवालानुसार बालकांच्या कुपोषणाची स्थितीही वाईट आहे.

2022 मध्ये भारत 107 व्या स्थानावर होता. आता यात भारत 111 स्थानी पोहचल्यानं देशातील कुपोषण, उपासमार, गरिबी, बेरोजगारी असे प्रश्न पुन्हा चर्चेत आले आहेत.

याच मुद्याकडे नेटकऱ्यांचे लक्ष वळवण्यासाठी प्रकाश राज यांनी ट्विट केले. प्रकाश राज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जेवतानाचा एक फोटो शेयर केला आहे. प्रकाश राज या ट्विटमध्ये लिहितात की, "सिटिझन हंगर इंडेक्स....जेव्हा राजा सत्तेसाठी भुकेला असतो तेव्हा.. "

या ट्विटमुळे आता पुन्हा प्रकाश राज हे चर्चेत आले आहेत. त्याचे हे ट्विट व्हायरल झाले असून अनेकांनी त्यांच्यावर टीका केली आहे.

मात्र नरेंद्र मोदींवर टीका करण्याची त्यांची ही पहिलच वेळ नाही. काही दिवसांपुर्वी त्यांचे चांद्रयान 3 वर केलेलं वक्तव्य वादाच्या भोवऱ्यात आले होते. त्यानंतर संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या मोदींच्या फोटोवरही त्यांनी टीका केली होती.

आपल्या भूमिकेवर ठाम राहून नेहमीच समाजातील वेगवेगळ्या गोष्टींवर आक्रमकपणे भूमिका मांडणाऱ्या प्रकाश राज यांचा चाहतावर्ग देखील तितकाच मोठा आहे. ते सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. त्यांना खटकणाऱ्या गोष्टी पोस्ट करत त्यावर सडेतोड भाष्य करत असतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Cold Wave : पुणे गारठले! पारा ९.४°C वर; तीन वर्षांतील विक्रमी नीचांकी तापमानाची नोंद, पुणेकरांना हुडहुडी!

Latest Marathi Breaking News Live Update : कूपर रुग्णालयातील शौचालयात पडून रुग्णाचा मृत्यू: उपचारातील दुर्लक्षाचा गंभीर आरोप

'या' प्रश्नाचं उत्तर देऊन सुष्मिता सेनने जिंकलेला मिस युनिव्हर्सचा ताज; काय होता तो प्रश्न? तुम्ही काय उत्तर दिलं असतं?

Pisces Love Horoscope 2026: 2026 मध्ये मीन राशीचं प्रेम कोणतं वळण घेणार? शनी सांगतो तुमचं वार्षिक राशीभविष्य

'उर्मिला कानेटकरचं जागी मला विचारण्यात आलं...' घासीराम कोतवाल या हिंदी नाटकात आशिष पाटीलची लावणी, साकारतोय 'गुलाबी' हे पात्र

SCROLL FOR NEXT