Actor Prakash Raj reacts on being called male version swara bhaskar after his support to shahrukh khan Google
मनोरंजन

'तू तर स्वरा भास्करचा मेल व्हर्जन'; प्रकाश राजवर ट्रोलर्सनी साधला निशाणा...

अभिनेते प्रकाश राज यांनी देखील ट्रोलर्सवर कडक शब्दात पलटवार केला आहे.

प्रणाली मोरे

Prakash Raj Trolled: अभिनेते प्रकाश राज यांना शाहरुख खान आणि त्यांच्या कुटुंबियांचे समर्थन करण चांगलेच महागात पडले आहे. सोशल मीडियावर प्रकाश राज यांच्यावर ट्रोलर्सनी (trollers)चांगलाचा निशाणा साधला आहे. काही नेटकऱ्यांनी प्रकाश राज यांवा स्वरा भास्करचा(Swara Bhasker) मेल व्हर्जन(Male Version) ही म्हटलं आहे. यावर आता प्रकाश राज यांनी कडक पलटवार केल्याचे दिसून आले आहे. चला जाणून घेऊया प्रकरणाविषयी सविस्तर....(Actor Prakash Raj reacts on being called male version swara bhaskar after his support to shahrukh khan)

सध्या सोशल मीडियावर बॉयकॉट ट्रेन्ड सुरू आहे. बॉलीवूड अभिनेत्यांच्या काही जुन्या वादग्रस्त विधानांना शोधून त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहेत आणि मग त्यांच्या सिनेमांना बॉयकॉट करणं सुरू आहे. असं नुकतंच आमिर खान आणि अक्षय कुमारसोबत घडलं आहे. आमिरच्या लाल सिंग चड्ढा आणि अक्षयच्या रक्षाबंधनला या बॉयकॉट ट्रेन्डचा चांगलाच फटका बसला. त्यानंतर नेटकऱ्यांनी शाहरुखचा एक जुना व्हिडीओ व्हायरल केला. ज्यात तो भारताविषयी बोलताना दिसत होता. झालं,मग काय त्याच्या पठाण सिनेमाला बॉयकॉट करण्याचा ट्रेन्ड ट्वीटरवर सुरू केला गेला.

प्रकाश राज यांनी शाहरुख आणि त्याच्या सिनेमाला बॉयकॉट करणाऱ्या ट्रेन्डवर प्रतिक्रिया दिली होती. त्यांनी एक व्हिडीओ आपल्या ट्वीटर अकाऊंटवर रिट्वीट केला होता. ज्यात शाहरुख आपल्या गुडघ्यांवर बसून एका दिव्यांग मुलीसोबत 'छय्या छय्या' गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. व्हिडीओला कॅप्शन देत त्यांनी लिहिलं होतं,''कोणीही येऊन शाहरुख आणि त्याच्या कुटुंबाचा अपमान कसं काय करू शकतो? आणि अशा अभिनेत्यालाअपमानित केलं जात आहे ज्यानं कितीतरी दशकांपासून लोकांना प्रेम आणि आनंद दिला आहे''. याला शेअर करत प्रकाश राज यांनी लिहिलं होतं, ''just asking बस पूछ रहा हू''.

बस्स झालं...प्रकाश राज यांच्या याच ट्वीटवर चिडून नेटकऱ्यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आणि म्हटलं,'स्वरा भास्करचा मेल व्हर्जन'. आता याच ट्रोलर्सच्या निशाण्यावर प्रकाश राज यांनी देखील पलटवार करताना ट्वीट केलं आहे की,''मला स्वरा भास्करचं मेल व्हर्जन म्हल्याने मी धन्य झालो आहे,हा माझा सम्मान आहे. पण तुम्ही कोणाचे व्हर्जन आहात?'' प्रकाश राज यांच्या या ट्वीटवर स्वराने देखील रिअॅक्ट केलं आहे. तिनं हात जोडलेला इमोजी शेअर करत लिहिलं आहे-''सर तुम्ही सगळ्यात बेस्ट व्हर्जन आहे''.

स्वरा भास्कर लवकरच 'जहां चार यार' सिनेमात दिसणार आहेत. तिच्या या सिनेमाची खिल्ली उडवत एका नेटकऱ्यांने लिहिलं होतं की, त्याला स्वरा भास्करच्या या सिनेमाची थिएटरमध्ये रिलीज होण्याची प्रतिक्षा आहे. यावर स्वरा भास्करने त्यांचे धन्यवाद मानले होते. पण तेव्हा नेटकऱ्याने पलटवार करत लिहिलं होतं-'माझ्या इमारतीत काम सुरु आहे,त्यामुळे आवाजाने मी झोपू शकत नाही. तेव्हा विचार करतोय,तुझा सिनेमा पहायच्या निमित्तानं थिएटरमध्ये जाऊन एक झोप काढेन'.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario : ४ जागांसाठी ७ संघांमध्ये शर्यत! प्ले ऑफमध्ये पोहोचण्याची कोणाला किती संधी? जाणून घ्या डोकं चक्रावून टाकणारं समीकरण

IPL 2026 Playoff Race: विजयासह कोलकाता नाइट रायडर्सची गाडी पुढे सरकली; दिल्ली कॅपिटल्सचे पॅकअप, Finn Allen चे वादळी शतक

Pune tenant & PG rules : पुण्यात भाडेकरू, पेईंग गेस्ट, वापरलेल्या वाहनांच्या व्यवहारांची माहिती पोलिसांना देणे अनिवार्य

Onion Price Crash: सटाणा बाजारात कांद्याला ५० रु. दर; संतप्त शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या हस्तक्षेपाने अनर्थ टळला

SSC Result : मंगळवेढा दहावी निकालात ५.८४ टक्के घसरण; इंग्लिश स्कूलची स्वर्णश्री धनंजय पाटील ९९.८० टक्क्यांसह तालुक्यात अव्वल

SCROLL FOR NEXT