Ranbir Kapoor  Sakal
मनोरंजन

Ranbir Kapoor: 'बीबीसीमध्ये काय चाललंय?', प्रमोशनदरम्यान रणबीर कपूरने आयटी सर्वेक्षणाचा मुद्दा का उचलला?

या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त पार पडलेल्या एका कार्यक्रमात त्याने पत्रकारांच्या विविध प्रश्नांची उत्तरं मोकळेपणे दिलं.

सकाळ डिजिटल टीम

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर सध्या त्याच्या आगामी ‘तू झूठी मै मक्कार’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. रणबीर कपूरने या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त पार पडलेल्या एका कार्यक्रमात पत्रकारांच्या विविध प्रश्नांची उत्तरं मोकळेपणे दिले आहेत.

एवढंच नाही तर रणबीरने बॉलिवूडच्या अनिश्चित काळाविषयी प्रश्न विचारणाऱ्या महिला पत्रकाराला असा प्रतिप्रश्न केला, ज्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर प्रचंड होत आहे. या कार्यक्रमातील व्हिडीओ व्हायरल होत असून त्यावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया देखील येत आहेत.

रणबीरला या व्हिडीओमध्ये एक पत्रकार विचारते, “रणबीर, बॉलिवूडचं आता सध्या तळ्यातमळ्यात दिसत आहे.” रणबीर महिला पत्रकार तिचा प्रश्न पूर्ण करण्याआधीच तिला म्हणतो, “काय बोलतेयस? तू पठाणचे कलेक्शन पहिले नाहीस का?”

तसेच यानंतर संबंधित पत्रकाराने पुढचा प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला, रणबीरने तेव्हा तिला विचारले, “आधी मला हे सांगा की तुम्ही कोणत्या पब्लिकेशनचे आहात?” त्यावर ती पत्रकार उत्तर देते “बीबीसी न्यूज”.

रणबीर पब्लिकेशनचे नाव ऐकल्यानंतर तिलाच प्रतिप्रश्न विचारतो. “बीबीसी न्यूज. आता सध्या तुमच्या इथे पण काहीतरी सुरू आहे ना? त्याचं काय? त्याचे अगोदर उत्तर द्या.” त्यानंतर रणबीरला संबंधित पत्रकार म्हणते, “सांगेन मी आरामात.” रणबीर तेव्हा म्हणतो, “मग मीसुद्धा आरामातच सांगेन.”

रणबीर कपूरच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होतोय. आयकर विभागाने कथित करचुकवेगिरीच्या चौकशीचा एक भाग म्हणून दिल्ली आणि मुंबईतल्या बीबीसी न्यूजच्या कार्यालयात सर्वेक्षण केले होते. तेव्हा त्याची जोरदार चर्चा होती. रणबीरने याच मुद्द्यावरून पत्रकाराला घेरलं.

रणबीर कपूरचा ‘तू झूठी मै मक्कार’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन लव रंजनने केलं आहे. ‘सोनू के टिटू की स्विटी’ या सुपरहिट चित्रपटाचं देखील या दिग्दर्शकाने दिग्दर्शन केलं होतं. या चित्रपटात रणबीरसोबत अभिनेत्री श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत आहे. येत्या 8 मार्च रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sahyadri Tiger Reserve : वाघांची डरकाळी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात घुमणार, आणखी आठ वाघ वास्तव्यास येणार; केंद्र-राज्य शासनाचा निर्णय

PM Narendra Modi : 'ऑपरेशन सिंदूर' वेळी कॉंग्रेस पाकिस्तानच्या लष्कराच्या पाठिशी; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हल्लाबोल

१६ वर्षांच्या भावाला आणून द्या आणि सामना खेळवा; पहलगाम हल्ल्यात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांचा भारत-पाकिस्तान मॅचला विरोध

Pune Traffic Update : पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी शास्त्रीनगर चौकात उपाययोजना; वाहतूक कोंडीवर तोडगा

Video : शुभांशु शुक्लांनी सांगितलं, अंतराळात व्यायाम कसा करतात? तशीच आसने पृथ्वीवर केल्यास शरीराला कोणते फायदे होतात, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT