Ravindra Mahajani Death:  Esakal
मनोरंजन

Ravindra Mahajani Death: कुऱ्हाडीचा घाव बसला आणि रक्ताच्या... त्या दिवशी रविंद्र महाजनी साक्षात मृत्युला सामोरे गेले

Vaishali Patil

Ravindra Mahajani Death:  आज सकाळी मनोरंजन विश्वातुन एक धक्कादायक बातमी समोर आली ज्याने सर्वांनाच धक्का बसला. जेष्ठ मराठी अभिनेते रवींद्र महाजनी यांचे वयाच्या 77 व्या वर्षी निधन झालं. तळेगाव दाभाडे येथील आंबी गावातील फ्लॅटमध्ये रवींद्र मृतावस्थेत आढळले. दोन दिवसांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे.

मराठी मनोरंजन विश्वातील देखणा नट म्हणुन अभिनेते रवींद्र महाजनींना ओळखलं जातं होतं. इतकच नाही तर मराठी चित्रपटसृष्टीतील विनोद खन्ना त्यांना म्हणायचे.

१९७५ ते १९९० चा काळ आपल्या दमदार आवाजाने, देखण्या रुपानं आणि जोरदार अभिनयानं रवींद्र महाजनी यांनी गाजवला. त्यांची त्याच्या कारकिर्दीत अनेक हिट सिनेमे दिले. 'झुंज' चित्रपटातून त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं.

त्यांचा देवता 'झुंज', 'आराम हराम आहे', 'लक्ष्मी', 'लक्ष्मीची पावलं', 'गोंधळात गोंधळ' हे चित्रपट खूप गाजले. मात्र त्यांचा रवींद्र महाजनी 'सतीची पुण्याई' हा चित्रपट खुप चर्चेत आला होता. या चित्रपटाच्या सेटवर रवींद्र महाजनी हे गंभीर जखमी झाले होते.

'सतीची पुण्याई' या चित्रपटाची शुटिंग कोल्हापूरात सुरु होती. यात रवींद्र महाजनी यांच्यासोबत आशा काळे, निळू फुले, लीला गांधी यांच्यासारखे कलाकार देखील होते. या चित्रपटातील दरोडेखोरांसोबत हाणामारीचा सीन शुट करणं रवींद्र महाजनी यांना खुप महागात पडलं.

'सतीची पुण्याई' चित्रपटातील हा सीन शुट करताना दरोडेखोर बनलेल्या कलाकारांच्या हातात नकली नाही तर खऱ्या कुऱ्हाडी देण्यात आल्या होत्या.

ही सीन खरा दिसावा असा काहीसा प्रयत्न दिग्दर्शकाचा असावा मात्र खऱ्याखुऱ्या कुऱ्हाडीसोबत शुटिंग करण्याची कल्पना रवींद्र महाजनी यांना मुळीच आवडली नाही.

त्यामुळे काही घात होवू शकतो, कुणाला गंभीर दुखापत होऊ शकते. अशाप्रकारे शुटिंग करणं हे धोक्याचं ठरु शकतं असं वारंवार सांगण्याचा प्रयत्नही रवींद्र यांनी केला मात्र चित्रपटाच्या शुटिंग टिम त्याकडे लक्ष दिलं नाही अन् रवींद्र महाजनी यांना ज्यांची भिती होती तेच घडलं.

सीन शुट करण्यास सुरुवात झाली तेव्हा दरोडेखोराची भुमिका साकरणाऱ्या एका कलाकाराच्या हातातल्या कुऱ्हाडीचा वार रवींद्र महाजनी यांच्याच हाताला लागला.

कुऱ्हाड खरी असल्यानं हा घाव इतका जोरात होता की, रवींद्र महाजनी यांच्या हातातून रक्ताची चिळकांडीच उडाली. पुर्ण सेटवर रक्त पसरले होते.

या सीनबद्दल रवींद्र महाजनी जेव्हाही या सीनबद्दल सांगितलं त्यावेळी ते स्वत: शहारायचे . आजही रवींद्र महाजनी यांच्याबद्दलचा हा किस्सा ऐकल्यावर अंगावर काटा येतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

समृद्धीवर सराफ व्यापाऱ्याला लुटलं, 4,78,79,000 रुपये किंमतीचं सोनं अन् रोकड घेऊन दरोडेखोर फरार

‘हाफ सीए’ सीझन २: सीए बनायची स्वप्न पाहणाऱ्या तरुणांची कहाणी आता ओटीटीवर; ट्रेलर प्रदर्शित

Gold-Silver Rate Today: सोन्याचा दर खाली, चांदीतही घसरण! तुमच्या शहरातील ताजे भाव तपासा

Latest Marathi News Updates : नागपुरात मारबत उत्सवाला सुरुवात, १४४ वर्षांची आहे परंपरा

Airtel Recharge : एअरटेलचा पुन्हा धक्का! 'या' रिचार्ज प्लॅनचे दर झाले कमी, पण ग्राहक का नाराज? जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT