salman khan  Sakal
मनोरंजन

Salman Khan: सलमान खान दिसला सिक्स पॅक अ‍ॅब्सवर एक्स गर्लफ्रेंड फिदा, कमेंट करत म्हणाली...

अभिनेता सलमान खान सध्या त्याच्या आगामी 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे.

Aishwarya Musale

अभिनेता सलमान खान सध्या त्याच्या आगामी 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. चित्रपटाची रिलीज डेट अगदी जवळ आली आहे. अशा परिस्थितीत सलमान खानही त्याच्या प्रमोशनमध्ये कोणतीही कसर सोडत नाहीये.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरूनही भाईजान त्याच्या चाहत्यांना त्याच्या रिलीजच्या तारखेची वारंवार आठवण करून देत आहे. काल त्याने स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे, जो पाहून चाहत्यांना त्याच्या फिटनेसची खात्री पटली आहे.

सलमान खान त्याच्या फिटनेसची खूप काळजी घेतो. यासाठी तो रोज तासन् तास जिममध्ये घाम गाळतो. काल अभिनेत्याने इंस्टाग्रामवर जिममधून स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये तो त्याचे सिक्स पॅक अॅब्स फ्लॉंट करताना दिसत आहे.

फोटोमध्ये सलमान घामाने भिजलेला दिसत आहे. घामामुळे त्याचा टी-शर्ट पूर्णपणे शरीराला चिकटला आहे आणि अॅब्सचा आकार दिसू लागला आहे.

सलमान खानच्या या फोटोवर यूजर्स जोरदार कमेंट करत आहेत. यासोबतच सेलेब्स देखील अभिनेत्याचे कौतुक करताना दिसत आहेत. पण, सगळ्यात जास्त लक्ष वेधून घेतले ते म्हणजे सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड संगीता बिजलानीची कमेंट.

सलमानच्या सिक्स पॅक अॅब्सचे कौतुक करत संगीताने फायर इमोजी पोस्ट केला आहे. त्याचबरोबर सलमानचे चाहतेही त्याचे कौतुक करताना थकत नाहीत. एका यूजरने लिहिले की, ''सलमान की झलक, सबसे अलग".

'किसी का भाई किसी की जान' हा चित्रपट 21 एप्रिलला ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात पूजा हेगडे सलमान खानसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. त्यांच्याशिवाय व्यंकटेश, जगपती बाबू, शहनाज गिल, पलक तिवारी, सिद्धार्थ निगम यांसारखे स्टार्सही चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरूंचं अपघाती निधन, पत्नीचाही मृत्यू; मूळ गावी जाताना घडली घटना

Latest Marathi News Updates : कोल्हापुरात रात्री झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलिसांची दोन्ही समाजांसोबत बैठक

Chhagan Bhujbal : लिंगायत समाजातील पोटजातींचा लवकरच ओबीसींमध्ये समावेश; मंत्री छगन भुजबळ यांचे प्रतिपादन!

"म्हणून मी वडिलांचं टॅक्सी चालवणं बंद केलं.." ती आठवण सांगताना ढसाढसा रडले भरत जाधव; जुना VIDEO चर्चेत

Rohit Sharma नवी लँबॉर्गिनी घेऊन निघाला, मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये अडकला; फॅनने पाहताच पाहा कशी दिली रिअ‍ॅक्शन

SCROLL FOR NEXT