Sanchari Vijay  
मनोरंजन

अपघातानंतर अभिनेता संचारी विजय कोमात; प्रकृती गंभीर

बाईक अपघातात विजयच्या डोक्याला जबर मार

स्वाती वेमूल

राष्ट्रीय पुरस्कार विजेता कन्नड अभिनेता संचारी विजयचा Sanchari Vijay शनिवारी भीषण अपघात झाला. बेंगळुरूतील Bengaluru जे.पी. नगर याठिकाणी बाईकवरून जात असताना त्याचा अपघात झाला. यावेळी बाईकवर विजयचा मित्र नविन मागे बसला होता. रस्त्यावरील एका इलेक्ट्रिक पोलला त्यांची बाईक जोरात आदळली आणि हा अपघात झाला. या अपघातात ३८ वर्षीय संचारी विजय आणि त्याचा ४२ वर्षीय मित्र नविन दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. (Actor Sanchari Vijay critical after road accident in Bengaluru)

शनिवारी रात्री ११.४५ च्या सुमारास नविन आणि विजय हे औषधं खरेदीसाठी घरातून निघाले होते. नविनच्या घरी रात्री जेवल्यानंतर हे दोघं बाहेर पडले आणि त्याच्या घराजवळच काही अंतरावर हा अपघात जाला. विजय हा बान्नेरघट्टा रोडवरील वजारहल्ली इथं राहतो. पावसामुळे बाईकचा तोल ढासळला आणि हा अपघात झाल्याचं नविनने पोलिसांना सांगितलं. या दोघांनाही जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

नविनचा पाय फ्रॅक्चर झाला असून विजयच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे. "रात्री साडेबाराच्या सुमारास मला अपघाताविषयी समजलं. मी ताबडतोब रुग्णालयात धाव घेतली, तेव्हा विजय शुद्धीत नव्हता. पुढील ४८ तास त्याच्यावर डॉक्टरांची निगराणी असेल", असं विजयचा भाऊ सिद्धेश कुमार म्हणाला. विजय कोमामध्ये असून त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

कन्नड अभिनेते नीनासम सतीश याविषयी म्हणाले, "लॉकडाउनमध्ये गरजू आणि गरीब मुलांना अन्नधान्य पुरवण्याचं काम विजय आमच्यासोबत मिळून करत होता. त्याचप्रमाणे औषधांची व्यवस्थाही तो करत होता."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed News : जिल्हाधिकारी थेट विद्यार्थ्यांच्या रांगेत जमीनवर बसले; डिघोळआंबा शाळेत अन्नाचा आस्वाद घेत 'सरप्राइज स्टिंग'

58 वर्षांनंतर नवरात्रीत बनतोय दुर्मीळ योग! ‘या’ 3 राशींवर होणार विशेष कृपा म्हणे; पैसा, नोकरी अन् व्यवसायात मिळू शकतो मोठा फायदा

India T20 Squad : भुवनेश्वर कुमारचे ४ वर्षांनी पुनरागमन! न्यूझीलंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, वैभव सूर्यवंशीचीही निवड

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

IND vs WI, 1st T20I: शे होप पुन्हा नडला, पण पदार्पणवीर नमन धीरने दाखवला इंगा! रुदरफोर्डच्या आक्रमणाने विंडिज १७० धावा पार

SCROLL FOR NEXT