shah rukh khan, pathaan movie, shah rukh khan as a women viral photo  SAKAL
मनोरंजन

Shah Rukh Khan: किती गोड दिसतोय ना मी!.. शाहरुखच्या या फोटोने इंटरनेटवर घातलाय धुमाकूळ

पठाण निमित्ताने शाहरुख ट्विटरवर #AskSRK हे सेशन चालवत आहे.

Devendra Jadhav

शाहरुख खानने पठाण चं प्रमोशन करून सगळीकडे जोरदार हवा केली आहे. पठाण निमित्ताने ४ वर्षांनी शाहरुख खान मोठया पडद्यावर प्रमुख भूमिका साकारणार आहे. पठाण निमित्ताने शाहरुख ट्विटरवर #AskSRK हे सेशन चालवत आहे. या अंतर्गत शाहरुख खान त्याच्या फॅन्सशी स्वतःहून संवाद साधत आहे. याच सेशनमध्ये गमतीशीर प्रकार घडला.

शाहरुख खानच्या एका फॅनने त्याचा स्री वेषभूषेतला एक फोटो पोस्ट केलाय. या फोटोवर या फॅनने गमतीशीर कॅप्शन पोस्ट केलंय. हा फोटो सध्या इंटरनेटवर चांगलाच धुमाकूळ घालतोय. शाहरुखपर्यंत हा फोटो पोहोचला. या फोटोची शाहरुखने दखल घेत गमतीशीर कॅप्शन पोस्ट केलंय.

शाहरुख म्हणतो,"अरे नाही हा मीच आहे ज्याने स्त्रियांचे कपडे घातलेले आहेत. मला माहित आहे की मी प्रत्येक गेटअप मध्ये आकर्षक दिसतो.. परंतु मित्रा, तुला स्वतःसाठी एक चांगली स्री शोधावी लागेल!! तुझी दिशाभूल केल्याबद्दल मला माफ कर." अशी पोस्ट शाहरुखने लिहिली आहे.

एकूणच सिनेमाआधी फॅन्सशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्यासोबत गप्पा मारून शाहरुख नकळतपणे पठाण चं प्रमोशन करतोय. खरं तर प्रदर्शनापूर्वीच बॉलीवूड, टॉलीवूडच्या सिनेमांना मोठी अॅडव्हान्स बुकींग मिळणं ही काही नवी गोष्ट नाही. मात्र ते बुकींग कोटींच्या घरात असेल तर त्याची चर्चा होणं स्वाभाविक आहे.

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून शाहरुखनं त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन चाहत्यांच्या आनंदाच्या, उत्सुकतेच्या पोस्ट शेयर केल्या आहेत. त्याला मिळालेला प्रतिसादही मोठा आहे.

पठाण सिनेमा आधीपासून चर्चेत आहे. सुरुवातीलाच बेशरम रंग गाण्यावरून पठाण विषयी चांगलाच वाद रंगला. पठाण मध्ये दीपिका पदूकोण,जॉन अब्राहम,डिंपल कपाडिया,आशुतोष राणा असे अनेक कलाकार आहेत. दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. यश राज फिल्म्सच्या प्रॉडक्शन अंतर्गत हा सिनेमा बनवण्यात आला आहे. शाहरुख खानचा 'पठाण' सिनेमा २५ जानेवारी २०२३ रोजी रिलीज होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: हा व्हिडिओ खास आहे... नातं रक्ताचं नव्हतं, पण... जंगलात वाजली शहनाई, CRPF जवानांनी निभावलं वधूच्या भावाचं कर्तव्य

Ashadhi Wari 2025 : बंधुभेटीच्या सोहळ्याने अवघे वैष्णव भावुक; संत ज्ञानेश्वर महाराज-संत सोपानदेवांच्या भेटीचा सोहळा अनुभवण्यासाठी गर्दी

Satara Crime : धोमच्या चोरीप्रकरणी एकास अटक; नवनाथ दत्त मंदिरातील दानपेटी फोडून रोख रक्कम लंपास

Public Health Corruption: आरोग्य खात्यात साहित्य खरेदीत गैरव्यवहार; आमदार डाॅ. राहुल पाटील यांचा विधानसभेमध्ये आरोप

Latest Maharashtra News Updates : सीमाप्रश्‍नी तज्ज्ञ समितीच्या अध्यक्षपदी धैर्यशील माने यांची नियुक्ती, महाराष्ट्र सरकारकडून प्रसिद्धीपत्रक जारी

SCROLL FOR NEXT