Sharad Ponkshe Esakal
मनोरंजन

Sharad Ponkshe: 'सेल्युलर जेलच्या बाहेर...', शरद पोंक्षेची पुन्हा चर्चा

Vaishali Patil

मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेते शरद पोंक्षे सध्या बरेच चर्चेत असतात. त्यांची वादग्रस्त विधाने आणि राजकीय मतं यामुळे ते सर्वांचं लक्ष त्यांच्याकडे लागलेले असते. ते सोशल मिडियावर सक्रिय असतात. इतकच नाही तर ते अनेक सामाजिक आणि राजकीय विषयावर निर्भीडपणे भाष्यही करत असतात. पोंक्षे यांचे विचार, हिंदुत्वाप्रती असलेलं प्रेम आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर असलेली निष्ठा सर्वांनाच माहीत आहे. शरद पोंक्षे राष्ट्रप्रेमावर व्याख्यान देत असतात

नुकतीच त्यांनी पुन्हा सोशल मीडियावर एका पोस्ट शेअर केली आहे आणि सर्वांचे लक्ष त्याच्याकडे वेधुन घेतलं आहे. शरद पोंक्षे यांनी एक फोटो शेअर केला आहे जो अंदमानच्या सेल्युलर तुरुंगाच्या आवारात काढण्यात आला आहे. त्यासोबतच त्यांनी एक नोट लिहिली आहे.

त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं की, ‘आज सेल्यूलर जेलच्या बाहेर सावरकर बागेत सावरकर सांगताना. (टीका करणाऱ्यांनी टीका करा, आम्ही सावरकर पोहोचवतो)’. त्यामुळे पुन्हा एकदा त्यांची ही पोस्ट चर्चेत आली आहे.

शरद पोंक्षे यांची ही पोस्ट सध्या चर्चेत आली आहे. या पोस्टसोबत त्यांनी काही फोटो देखील शेअर केले आहेत. ही पोस्ट शेअर करत त्यांनी पुन्हा सावरकर यांच्या विरोधात बोलणाऱ्यांवर टिका केली आहे. त्याचबरोबर तुम्ही टिका करत रहा मी माझ काम करत राहिलं असं सांगितलं आहे. मी नथुराम गोडसे बोलतोय या नाटकामुळं शरद पोंक्षे हे चर्चेत आले होते. त्यानंतर त्यांनी सावकर, गोडसे आणि हिंदुत्ववादाबाबत थेट भूमिका घेत त्याच स्पष्ट मतं व्यक्त करण्यास सुरवात केली.

शरद पोंक्षे सध्या 'ठिपक्यांची रांगोळी' या मालिकेत प्रमुख भूमिकेत आहेत. याशिवाय नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'हर हर महादेव' चित्रपटातही ते होते. अभिनया पलीकडे ते राष्ट्रप्रेमासाठी काम करतात. त्यासाठी ते व्याख्यान देत गावोगाव फिरत असतात. त्यांच्या व्याख्यानाच्या व्हिडिओ सोशल मिडियावर बऱ्याच चर्चेत असतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharmendra Pradhan On Resignation जेन झींची दिशाभूल केली, राजीनाम्यानंतर धर्मेंद्र प्रधानांनी सोडलं मौन; पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया

Jharkhand Tourism : झारखंडचा लोध धबधबा; जिथे पाण्याच्या प्रचंड प्रवाहात दडले आहे अथांग डोहाचे गूढ!

UP Career Guidance: IAS-IPS अधिकारी आता थेट शाळेत; १२ वीच्या विद्यार्थ्यांना करिअरचे धडे देणार योगी सरकार

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पुढील पाच दिवसांचा हवामान अंदाज, १० जिल्ह्यांना अलर्ट; विजांसह वादळी पावसाचा इशारा

India Justice Access Reforms: न्यायालयापर्यंत पोहोचणे सोपे करा; CJI सूर्यकांत यांचा विधी सेवा यंत्रणेला संदेश, मुख्यमंत्र्यांना आठवल्या अहिल्यादेवी

SCROLL FOR NEXT