actor siddharth jadhav was hospitalized for a week shared post about his health update sakal
मनोरंजन

अभिनेता सिद्धार्थ जाधवच्या तब्येतीत बिघाड, आठ दिवस होता रुग्णालयात..

अभिनेता सिद्धार्थ जाधवने चाहत्यांची चिंता वाढवणारी पोस्ट केली आहे.

नीलेश अडसूळ

siddharth jadhav : मराठी मनोरंजन विश्वातील सदैव आनंदी असणारा, हसणारा - हसवणारा आणि उर्जेने भरलेला असा अभिनेता म्हणजे सिद्धार्थ जाधव. आजवर नाटक आणि चित्रपटातून त्याने आपल्या भुरळ घातलीच शिवाय बॉलीवूडलाही वेड लावले. नूकताच सिद्धार्थचे 'तमाशा live' हा चित्रपट येऊन गेला तर त्याचा 'दे धक्का 2' हा चित्रपट अक्षरशः धुमाकूळ घळतोय. त्यामुळे गेले दिवस सिद्धार्थ सातत्याने कॅमेऱ्यासमोर आणि चर्चेत आहे. पण हीच धावपळ त्याच्या अंगाशी आलेली दिसतेय. गेले काही दिवस तो प्रचंड आजारी होता. या संदर्भात माहिती देणारी एक पोस्ट त्याने नुकतीच शेयर केली. यामध्ये त्याने चाहत्यांची चिंता वाढवली आहे. (actor siddharth jadhav was hospitalized for a week shared post about his health update)

सिद्धार्थ मागचा एक आठवडा हॉस्टिपटलमध्ये होता. आज 15 ऑगस्ट रोजी त्याला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला. त्यानंतर सिद्धार्थनं स्वत: पोस्ट लिहून आपल्या प्रकृती विषयी चाहत्यांना कळवले आहे. गेल्या काही दिवसात सातत्याने केलेली धावपळ आणि दगदगीमुळे त्याच्या प्रकृतीवर परिणाम झाला आहे. सिद्धार्थने शेयर केलेल्या पोस्ट मध्ये त्याने रुग्णालयातील एक फोटो शेयर केला आहे. सोबतच एक मोठे कॅप्शन दिले आहे.sid

सिद्धार्थ म्हणतो, 'नमस्कार .... गेला आठवडाभर मी हिंदुजा हॉस्पिटल मध्ये अॅडमिट होतो..आज घरी आलो... मनापासून आभार हिंदुजा हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांचे..खुप मनापासुन काळजी घेतली माझी... अभिनव महाडीक दादा आणि त्यांची संपूर्ण टिम... एका फोन वर नेहमीच धावून येणारे अमेय खोपकर दादा ....शशांक नागवेकर दादा.. लव्ह यू अलवेज..

पुढे तो म्हणतो, 'सतीश राजवाडे दादा आणि स्टार प्रवाह परिवार तुमचा पाठिंबा खुुप महत्त्वाचा होता..... आणि माझा मोठा भाऊ डॉ. लावेश जाधव जो रात्रभर जागून माझी काळजी घेत होता.. मी बरा व्हाव्हा म्हणून ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं.. त्यांना मनापासून धन्यवाद... आता हळूहळू बरा होतोय... खुप धावपळ असते आपली... पण त्यातही स्वतःच्या तब्येतीकडे कडे दुर्लक्ष होणार नाही याची कृपया काळजी घ्या...' सिद्धार्थला नेमकं काय झालं होतं, हे यात लिहिलं नसलं तरी त्याच्या या पोस्ट मुळे चाहत्यांची चिंता वाढली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hotel Bhaghyashree: 'हॉटेल भाग्यश्री'च्या मालकाने घेतला मोठा निर्णय; कोट्यवधी रुपयांची केली गुंतवणूक, हॉटेल बंद...

Pune News: कोथरुडमधील आजी-आजोबांच्या वडापाव गाडीवर महापालिकेचा अन्याय, तोंडचा घास हिरावणारी कारवाई

प्राजक्ताने खरेदी केली अलिशान गाडी! व्हिडिओ शेअर करत म्हणाली...'आई शप्पथ! लई भारी वाटतंय स्वप्न पुर्ण होताना..'

Eknath Shinde: पुण्यात एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरात'ची घोषणा; अमित शाहांच्या उपस्थितीत नारेबाजी, व्हिडिओ व्हायरल

IND vs ENG 2nd Test: W,W,W,W,W! मोहम्मद सिराज ऑन फायर, बेन स्टोक्स गांगरला; इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत परतला

SCROLL FOR NEXT